ऑटोमेटेड व्हेईकल फिटनेस टेस्टिंग सेंटर जळगाव येथे सुरु करण्याची वीर सावरकर रिक्षा युनियनची मागणी

जळगांव – आज दिनांक 22/01/2026 रोजी वीर सावरकर रिक्षा युनियन तर्फे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हाधिकारी व प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांना प्रशासनाने ऑटोमेटेड व्हेईकल फिटनेस टेस्टिंग सेंटर जळगाव रद्द केल्याच्या संदर्भात ती जळगाव परिवहन कार्यालयात पुर्वरत करावी यासाठी जळगाव जिल्ह्यातील वीर सावरकर रिक्षा युनियन चे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील बहुसंख्य रिक्षा चालक मालक व नागरिक याच्या उपस्थित जळगाव जिल्हाधिकारी व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले व भविष्यात होणाऱ्या त्रासाबद्दल अवगत करून ऑटोमेटेड व्हेईकल फिटनेस टेस्टिंग सेंटर जळगाव येथे पूर्वरत सुरु करावी अशी मागणी करण्यात आली.
जळगाव जिल्ह्यात ऑटोमेटेड व्हेईकल फिटनेस टेस्टिंग सेंटर नसल्यामुळे व्यावसायिक वाहनधारकांना फिटनेस प्रमाणपत्रासाठी नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगरला जावे लागत आहे,त्यामुळे इंधन, टोल, वेळ व व्यवसायाचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे याची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी ही तर अशी बाब झाली एखादा मृत्यू पावला तर आपल्याकडे विधी यंत्र नसल्यामुळे आपण त्याचा विधी करत नाही का ? तिथे पण आपण हेच सांगणार का , बाहेर शहरात जा आपण करतोच ना विधी संपन्न मग आपण सुद्धा विचार करावा आपल्या कार्यालयात जो पर्यंत सेंटर येत नाही तो पर्यंत मॅन्युअल पद्धतीने प्रोसेस करण्यात यावी ,आणि फिटनेस सर्टिफिकेट
आपल्या कार्यालयात अगोदर जशा पद्धतीने होत होते त्याप्रमाणे करावे .
Ats संबंधित यंत्रणा जेव्हा आपल्या कार्यालयात येईल तेव्हा आपण ही यंत्रणा राबवावी परंतू आपल्या कडे सुविधा नसताना आपण आपल्या सोयीसाठी आम्हा रिक्षा चालक मालकांना वेठीस धरू नये,याचा आपण विचार करावा
आम्हाला याचा आर्थिक भुरदंड का देत आहात आम्हास आपण वेगवेळ्या धोरणांचा अजेंडा सामोर ठेऊन आमचा बळी का देत आहात या सर्व पार्श्वभूमीचा विचार माय बाप सरकारने करावा ही कळकळीची विनंती
वीर सावरकर रिक्षा युनियन जिल्हाअध्यक्ष दिलीपभाऊ सपकाळे व समस्त यूनियन पदाधिकार व सदस्य रिक्षाचालक मालक यांनी यावेळी केली आहे.यावेळेस वाल्मिक सपकाळे,रमेश सोनार, शशिकांत जाधव, शांताराम पाटील, एकनाथ बारी, विलास ठाकूर, सागर सोनवणे, अर्जुन पवार, सुरेंद्र सपकाळे, संजय पाटील,रामचंद्र अढागे, रवींद्र कोळी, अभिजित बाविस्कर,मोहसीन शेख,संजय चौधरी,दिनकर ठाकरे,संदीप कुमावत,शिवाजी नाते,दीपराज देवरे,पोपट ढोबळे,महेंद्र ठाकूर,मनोहर चौधरी,निलेश पाटील,नितेश देवरे,संभाजी पाटील,अमोल तायडे,किरण पाटील,अजय पाटील, राहुल पाटील,हर्षल राजपूत, शिवाजी पाटील, भास्कर ठाकूर, कैलास विसपुते, भानुदास गायकवाड, सोमनाथ ठाकूर, बापू पाटील,प्रकाश पाटील, संतोष, क्षीरसागर, गोपाल पाटील, मुकेश चौधरी, सुखदेव जाधव व जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष –
श्री दिलीपभाऊ सपकाळे,
वीर सावरकर रिक्षा युनियन,
जळगाव.


