ताज्या बातम्या

पुण्यात चोरांची कमाल, चक्क ट्रॅफिक सिग्नलच्या बॅटऱ्या नेल्या चोरून !

पुणे जिल्हा प्रतिनिधी कामरान शेख

शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी सिग्नल चौकांवर बसवण्यात आलेल्या ट्राफिक कंट्रोलर बॉक्समधील बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा वानवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत मे. विंध्या टेली लिंक्स लि. कंपनीकडून सिग्नल व्यवस्थापनाचे काम पाहिले जाते. वानवडी पोलीस ठाणे हद्दीतील काळूबाई चौक, ए.एफ.एम.सी. चौक व रेस कोर्स चौक येथील सिग्नल कंट्रोलर बॉक्समधील एकूण सहा बॅटऱ्या चोरीस गेल्याची तक्रार २७ जानेवारी २०२६ रोजी दाखल झाली होती.

पोलिसांनी रिक्षाची झडती घेतली असता ३४ बॅटऱ्या (किंमत अंदाजे ६८,००० रुपये), एक लोखंडी कटावणी व चोरीसाठी वापरलेली रिक्षा असा एकूण १,६८,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासात या बॅटऱ्या काळूबाई चौक, ए.एफ.एम.सी. चौक, रेस कोर्स चौक, बी.टी. कवडे चौक, सांदलबाबा चौक, धोबी घाट चौक तसेच सिटीप्राईड/पुष्पमंगल चौक येथून चोरी केल्याचे उघड झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *