प्रा.सुरेश वाघ यांची उपाध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र पोलीस मित्र म्हणून निवड

नाशिक / आज रोजी कलेक्टर ऑफिसच्या बाजूला, अल्प बचत भवनमध्ये दुपारी तीन वाजता कर्तव्य दक्ष पोलीस मित्र फाउंडेशन यांची सभा अतिशय उत्साहात पार पडली. सदर सभेमध्ये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुरेश वाघ, राष्ट्रीय हिंदू संगटन यांचे उपजिल्हाध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र साठी पोलीस मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती ही सुनील भाऊ परदेशी, अध्यक्ष, कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन यांच्याद्वारे केले गेली.
सदर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर श्री सुनील सिंह लता पुरणसिंह परदेशी यांनी दूरध्वनीवरून त्यांचे अभिनंदन केले. नियुक्ती झाल्यानंतर सुरेश वाघ यांनी जनता व पोलीस यांच्यामधील दुवा म्हणजे पोलीस मित्र होय. म्हणून आपण कर्तव्यात कसूर न करता जबाबदारीने कार्य पार पाडू असे आश्वासन समन्वयक समितीला दिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संपूर्ण समन्वयक समिती यांनी परिश्रम घेतले.


