ताज्या बातम्या

धरणगाव येथील यशवंत अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटीच्या वतीने लेखापरीक्षक श्री.प्रकाश चौधरी(भुसावळ) यांना राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट लेखापरीक्षक’ पुरस्कार;

धरणगाव –आळंदी येथील अधिवेशनात मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने चेअरमन श्री सम्राट परिहार तसेच मॅनेजर श्री.किरण मराठे,श्री पी.पी.चौधरी साहेबांचे सहाय्यक श्री दिलीप सोनार(जळगाव)व कर्मचारी वर्ग यांच्यातर्फे साहेबांचा कार्याचा यथोचित सत्कार करण्यात आला.
श्रीक्षेत्र आळंदी येथे ऑडिटर्स कौन्सिल ॲण्ड वेल्फेअर असोसिएशन,पुणे,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित’प्रमाणित लेखापरीक्षक राज्यस्तरीय अधिवेशन व कार्यशाळा’या दोन दिवसीय कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यामधील कुऱ्हे पानाचे येथील प्रमाणित लेखापरीक्षक श्री.प्रकाश प्रल्हाद चौधरी यांचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांक ‘उत्कृष्ट लेखापरीक्षक पुरस्कार’देऊन गौरव करण्यात आला.
​दिनांक २१ व २२ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या या ऐतिहासिक अधिवेशनात महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांमधून कानाकोपऱ्यातून शेकडो लेखापरीक्षक उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय लेखापारीक्षकांचे अधिवेशन संपन्न झाले.
​कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या भव्य पारितोषिक वितरण समारंभात,श्री.प्रकाश चौधरी यांना त्यांच्या लेखापरीक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आणि सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल “राज्यस्तरीय प्रथम क्रमांक उत्कृष्ट लेखापरीक्षक”म्हणून स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
​पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री.चौधरी म्हणाले की,हा सन्मान माझा एकट्याचा नसून जळगाव जिल्ह्यातील सहकारी संस्था आणि जिल्ह्यातील सर्व लेखापरीक्षकांचा आहे. या पुरस्कारामुळे मला भविष्यात आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल.
​या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष श्री.रामदास शिर्के यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. श्री.पी.पी.चौधरीसाहेब यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल जळगाव
जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे.यशवंत अर्बन संस्थेने जो माझा सत्कार केला त्याबद्दल चौधरी साहेबांनी संस्थेचे चेअरमन श्री सम्राट परिहार तसेच व्हा. चेअरमन श्री सी के आबा,सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *