ताज्या बातम्या

धरणगांव शहरातील अवैध धंदे बंद करा ; माजी उपनगराध्यक्ष देविदास माळी यांची मागणी

धरणगांव शहरात राज रोसपणे व बिनधास्तपणे सट्टा, मट्टा, पत्यांचे क्लब राजरोस पणे सुरु आहेत. याबाबत पोलिसांना कल्पना असल्यावर सुद्धा बुद्धिपूर्वक दुर्लक्ष करतात यामुळे अवैध धंदे चालकांची हिम्मत वाढली असून राजरोसपणे दारू, सट्टा, मटका, पत्यांचे क्लब सुरु आहेत. यामुळे अनेक जणांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तरी या सर्व अवैध दारू, सट्टा, मटका, पत्यांचे क्लब बंद व्हावेत अशी मागणी धरणगांव नगरपालिकेचे माजी उप नगराध्यक्ष देविदास मांगो माळी यांनी केली आहे. अन्यथा धरणगांव पोलिस स्टेशन समोर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर उपोषणास बसणार आहे. म्हणून हे अवैध धंदे, दारू, सट्टा, मटका, पत्यांचे क्लब ताबडतोब बंद व्हावे अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच देविदास माळी यांनी काही अवैध धंदे चालकांची नावे देखील उघड केली आहेत. सदर अर्ज जिल्हाधिकारी, जळगांव, पोलिस उपविभागीय अधिकारी, चोपडा, पोलिस अधीक्षक, जळगांव, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *