महाराष्ट्र

नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात अहिल्यादेवींची जयंती साजरी

लोकनायक (अजय शेरकर)

बीड – क्रांतीज्योती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परीषद व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र बीड येथे आज दिनांक ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त व ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधत कोरोनाचे नियम पाळुन व सोशल डिस्टंन्स ठेवून व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

जिल्हा पोलिस दलाच्या वतीने जिल्हा पोलिस दल प्रतिनिधी म्हणून पो.कॉ.रमाताई तुरूकुमारे यांनी आपले विचार मांडताना ‘विचार बदलले तर व्यसनमुक्ती सहज शक्य आहे असे प्रतिपादन केले.

प्रसंगी पोलिस अधीक्षक साहेब आर राजा यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, विभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके, प्रतिभा चाटे गणेश जाधव, डॉ.राजकुमार गवळे, प्रा अंजली ताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकल्प समन्वयक म्हणून अजय शेरकर, ओम डोलारे, प्रमोद गायकवाड, गणेश घंटेवाड, विजय दाभाडे, महीला समुपदेशक, वर्षा शेरकर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे