महाराष्ट्र

अंबड शहरातील जालना बीड रस्ता दोन्ही बाजूने वाहतुकीस खुला करा

लोकनायक (प्रतिनिधी - गणेशराव पाटील पाटोळे)

अंबड – शहरातील जालना बीड या मुख्य मार्गाचे बांधकाम पूर्ण झाले असून वाहतूक एकाच बाजूने सुरु आहे. ट्रैफिक जाम होणे, वाहतूक खोळंबणे, लहान सहान अपघात होणे, त्यातून वाद होणे, असे अनुचित प्रकार घडत आहेत. त्यासाठी पूर्व पश्चिम दोन्ही बाजूने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मत्स्योदरी देवी मंदिर गेट पर्यंत वाहतूक सुरु होणे गरजेचे आहे. नाली बांधकाम त्वरित करून रस्ता खुला करण्यात यावा अशी मागणी व्यापारी महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सद्यस्थितित पश्चिम बाजुचा रस्ता फक्त पार्किंग साठी उपयोगात आहे या मुळे याबाजूस असणाऱ्या दुकांनात ग्राहकास येण्यास अडचण होत आहे. तसेच नाली बांधकाम अत्यंत संथ गतीने शुरू आहे पावसाळ्यात पाणी रस्त्यावरुन दुकांनात येऊ शकते व मोठी हानी होऊ शकते कारण अनेक ठिकाणी दुकानांची ऊंची रस्त्यापेक्षा खाली आहे त्यामुळे नाली काम त्वरित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

जालना बीड या मुख्य मार्गा पासून अंबेडकर पुतळा चौक व महावीर चौक येथून उर्वरित शहरात जाण्यासाठी व्यवस्थित डायवर्शन नसल्याने अनेक वाहने पादचारी घसरून पडले आहेत. त्याचीही व्यवस्था तात्काळ व्हावी पावसाळ्यात याचा आणखी त्रास होऊ शकतो. अशा विविध मागण्यांचे निवेदन आज दि.९ जून रोजी  उपवीभागीय अधिकारी अंबड, पोलीस निरीक्षक अंबड, मुख्याधिकारी नपा अंबड यांना देण्यात आले आहे.

प्रसंगी व्यापारी महासंघ अंबड चे अध्यक्ष द्वारकादास जाधव, सचिव गणेश बोर्डे, ओमप्रकाश उबाळे, रमेश शहाणे, प्रवीण उदावंत, पिन्टूसेठ लाहोटी, गोपाल तोषणीवाल, सुनील मोहळे, शिवप्रसाद चांडक, जगदीश मूंदड़ा, वहाब अंसारी अजीज बेग यांच्या सह अनेक व्यापारी यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे