महाराष्ट्र

माणुसकी हीन होत असतांना सामाजिक कार्यकर्ते देत आहेत वृद्धांना आधार

लोकनायक न्यूज नेटवर्क

औरंगाबाद – माणुसकी हीन झालेल्या समाजातील लोकांनी आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात पैसे देऊन ठेवले आहे. तर काहिंनी दोन वेळेच जेवण मीळते म्हणून शासकीय रुग्णालयात आणून सोडले आहे. त्यांनी आपल्या आई-वडिलांना माणुसकी दाखवून घरी घेऊन जा. व एक महिना २१ दिवस सलून सेवा चांदीच्या वस्तऱ्याने सलुन सेवा मोफत मिळवा. ‘माणुसकी सलून’ तर्फे ही भन्नाट योजना समाजसेवक सुमित पंडित यांनी खऱ्या बेवारस आई-वडिलांचा शोध घेऊन त्यावर विचार करून हा निर्णय सलून मध्ये घेतला आहे.

माणुसकी सलुन सारा वैभव जटवाडा रोडवर आहे. जेणेकरून गरजवंत त्यांना वृद्धाश्रमात जागा मिळेल. यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. माणुसकी सलून तर्फे बऱ्याच समाज उपयोगी योजना चालू असतात. त्यापैकी आज समाजात होत असलेल्या आई-वडिलांचा वृद्धाश्रमात ठेवण्यात येत आहे. ही बाब लक्षात येता जे गरज म्हणत आहे ते बेवारस अवस्थेत औरंगाबाद शहरातील उड्डाणपुलाच्या खाली सार्वजनिक ठिकाणी मंदिराच्या जवळ शासकीय रुग्णालय परिसरात बरेचसे आई-वडील दोन वेळचे जेवण मिळतं म्हणून तिथे आपला उदरनिर्वाह भागवीत आहेत. एवढेच नाही तर आपल्या मुलांपर्यंत ही गोष्ट कळू करू नये म्हणून ते मुलांची विचारणा केली असता नाव सुद्धा सांगत नाहीत. पण माणुसकी हीन झालेल्या मुलांनी थोडीशी माणुसकी दाखवून आपल्या आई-वडिलांना घरी आणण्याची गरज आहे. जेणेकरून वृद्धाश्रम तरी रिकामे होतील आणि खऱ्या गरजवंतांना तिथे जागा मिळेल.

आजचच एक जीवंत उदाहरण म्हणजे एक सत्तर वर्षीय म्हातारी ही २ महिन्यापासुन घाटि रुग्णालयातील पतरेच्या शेड मध्ये बेवारस अवस्थेत होती. समाजसेवक सुमित पंडित हे रुग्णालयात रुग्णांना मदत करत असतांना त्या आजीची माहिती मीळाली. माहिती मिळताच सुमित पंडित यांनी बेगमपुरा पोलीस प्रशासनाशी संपर्क करून सदर आजीची माहिती दिली व चींचपुर ता सिल्लोड येथील वेनुताई वृध्दाश्रमातील साहेबराव दनके यांच्याशी संपर्क करुन आजीला तीथे अन्न वस्त्र नीवारा यासाठी जागा मीळाली व घाटि रुग्णालयासमोरील जमलेला समुदाय हा फक्त व्हिडिओ काढणे आणि फोटो काढण्यात व्यस्त होता. मात्र मदतीसाठी पुढे कुणीही आले नाही. समाजसेवक सुमित पंडित यांनी शासकीय रुग्णालय घाटी औरंगाबाद बऱ्याच जनांना वृध्दाश्रमात जाण्यासाठी वाहन मागीतले पण कुणीच पुढे आले नाही. शेवटि औरंगाबाद बसस्थानकावर जावुन बसने वृध्दाश्रमात नेले.

आजच्या ह्या महान कार्यासाठि समाजसेवक सुमित पंडित, अनिल लुनिया, गजानन क्षिरसागर, राजु पादीवाल, नीलेश चौथे, कचरु सुरडकर, समाजसेवीका सौ.पुजा पंडित, धनश्री पंडित, आदिनीं सहकार्य केले.

‘त्यांना’ दुःख देण्याचा आमचा काय अधिकार

ज्या आई-वडिलांनी आम्हाला लहानाचे मोठे केले स्वतःचे दुःख सहन करून आम्हाला सुखाची सावली दिली. असे असताना जेव्हा आई-वडिलांना एक टे सोडून देणे ही माणुसकी नाही. ही समाजातील कोणत्याही आई-वडिलांना त्रास न देता त्यांची सेवा केली पाहिजे. ज्यांच्या मुळे आम्ही जग पाहिले त्यांना दुःख देण्याचा आमचा कोणताहि अधिकार नाही.

– – – सुमित पंडित समाजसेवक औरंगाबाद

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे