जळगाव जिल्हाधरणगावधरणगाव तालुका

जिल्हा प्रशासनाने दिले धरणगाव तहसीलदार यांचे चौकशीचे आदेश : सौ.माधुरी अत्तरदे, जि.प.सदस्या

तलाठ्यांनी देखील आंदोलन घेतले मागे

प्रतिनिधी – योगेश पाटील

धरणगाव – धरणगाव तालुक्याचे तहसीलदार नितीन कुमार देवरे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. विवध माध्यमातून तहसीलदार यांच्यावर विविध प्रकारचे आरोप सुरु आहेत. सदर आरोपांचे तहसीलदार यांनी मात्र खंडन केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून वाळू वाहतूक करणारे वाहतूकदार, जि.प.सदस्या माधुरी अत्तरदे आणि तालुक्यातील तलाठी यांनी तहसीलदार यांच्यावर विविध प्रकारचे आरोप सुरु केले होते. त्यावर तहसीलदार यांनी आरोपांचे खंडन करीत माझ्यावर नाहक राजकीय षड्यंत्र रचले जात असल्याचे सांगितले होते. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी आपापल्या सह्यांचे अधिकार असलेले युनिट दि.२८/०४/२०२१ रोजी शासनास सुपूर्द करीत काम बंद आंदोलन पुकारले होते. तसेच आज दि. ०६ मे रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सौ.माधुरी अत्तरदे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

यासंदर्भात आज म.जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हा तलाठी संघाच्या पदाधिकारींसोबत बैठक झाली त्यात सर्वानुमते तलाठ्यांनी कामकाज सुरु करणेबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सर्व तलाठ्यांनी आपापल्या सह्यांचे अधिकार असलेले युनिट शासनाकडून पुन्हा मागितले आहेत. तसेच तलाठी संघटनेने महसूलचे नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांचे कडे निवेदन सादर करीत पुन्हा काम सुरु करीत असल्याचे पत्र दिले आहे. याबाबत तलाठी संघाचे अध्यक्ष एस.डी.गवई यांनी आम्हाला आमचे डी.एस.सी. युनिट सुस्थितीत मिळाले असून आम्ही पूर्ववत काम सुरु करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

शेवटची माहिती प्राप्त झाल्यानुसार सौ.अत्तरदे यांना प्रशासनाने तहसीलदार यांचेवर चौकशी समिती नेमून कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिल्याचे समजते. १५ दिवसात सदर समिती आपला अहवाल शासनास सादर करणार आहे. चौकशी अधिकारी म्हणून एस.आर.भारदे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जळगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच तहसिलदार नितीनकुमार देवरे यांच्याशी चर्चा केली असता, “मी नेहमी गोरगरीब नागरिक आणि शेतकरी यांना केंद्रबिंदू मानून माझे काम करीत असतो. परंतु काही तलाठी लोकांनी नाहक माझ्यावर आरोप प्रत्यारोप करून वेळ वाया घालवला. शेवटी तलाठी देखील माझेच सहकारी कर्मचारी आहेत त्यांनीही भविष्यात नागरिक व शेतकऱ्यांची कामे विनाविलंब करावीत हीच माझी अपेक्षा आहे. जि.प.सदस्या यांचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत चौकशीस तयार असून सत्य हे बाहेर येईलच” असे ते म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे