धरणगावब्रेकिंग

धरणगाव तालुक्यातील भोद येथील इसमाची पत्नी व मुलीसह सामुहिक आत्महत्या

धरणगाव – तालुक्यातील भोद येथील व धरणगाव-एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक असलेले भाजप चे तालुका उपाध्यक्ष यांनी पत्नी व मुलीसह सामुहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

राजेंद्र रायभान पाटील यांनी पत्नी व मुलगी यांच्यासही शिंदखेडा तालुक्यातील दभाशी नजीकच्या पुलावरून तापीनदीत उडी घेतल्याचे माहिती प्राप्त होत आहे. दोन दिवसांपासून त्यांची गाडी पुलावर बेवारस लागली होती. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील भोद येथील राजेंद्र रायभान पाटील(वय-५४), पत्नी सौ.वंदनाबाई राजेंद्र पाटील (वय-४८), मुलगी म्यॉनल राजेंद्र पाटील (वय-२१) हे तिघ जण टाटा इंडीका (एमएच-१९/एपी-१०९४) गाडीने दि.१७ रोजी सकाळी अमळनेर तालुक्यातील भरवस या सासरवाडीच्या गावाला गेले होते. येथे उत्तराकार्याचा कार्यक्रम असल्याने राजेंद्र पाटील पत्नी व मुलीसह सासरवाडीला आले होते. दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास ते घरी भोद येथे येण्यासाठी निघाले मात्र, ते भोदला पोहचलेच नाही. दरम्यान सायंकाळी ६ वाजेनंतर त्यांची गाडी शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावानजीक तापी नदीवर असलेल्या पुलावर लागलेली दिसली. दि. १८ दुपारी ४ वाजता राजेंद्र पाटील यांचे प्रेत नदीत तरंगतांना दिसल्यानंतर परिसरात खळबळ निर्माण झाली. रात्री उशिरा राजेंद्र पाटील यांच्या मुलीचा मृतदेह सुध्दा तरंगतांना दिसला. दरम्यान, राजेंद्र पाटील यांच्या पत्नीचा शोध घेतला जात होता. बुधवारी पुन्हा शोधमोहीम सुरु करण्यात येणार आहे.

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील हे घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्यात सहभागी झाले आहेत. त्यांचे सह गुलाब बाबा पाटील व भोद येथील सरपंच राजेंद्र पाटील हे देखील त्यांचे सोबत आहेत. यासंदर्भात शेतकी संघाचे माजी अध्यक्ष रमेश पवार व पणन संघाचे संचालक संजय पवार यांनी दुख व्यक्त केले आहे.

आत्महत्येचे गुढ कायम

राजेंद्र पाटील यांच्या कुटूंबियांसोबतच्या आत्महत्येचे गुढ कायम आहे. सासरवाडीला अतिशय सामान्य परिस्थितीत घरून निघालेल्या या कुटूंबाने थेट तापी नदीत उडी का घेतली ? सधन असलेल्या या कुटूंबाला आर्थिक चणचण असण्याचे कारण नाही. शिवाय राजेंद्र पाटील हा अतिशय हिमतीचा माणूस होता. मग, त्यांनी पत्नी, मुलीसह आत्महत्या का केली असावी. आत्महत्या करण्यापूर्वी चिट्ठी लिहून ठेवली आहे का ? आत्महत्येस काही कौटुंबिक वाद विवाद आहेत का ? याबाबत देखील शंका उपस्थित करण्यात येत आहेत.

संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे