ताज्या बातम्या

Breaking News : जळगावच्या दोन आर टी ओ एजंटांना लाच भोवली ; लाच लुचपत विभागाचा यशस्वी सापळा

जळगाव – प्रवासी बस हस्तांतरित करण्याच्या मोबदल्यात आर टी ओ अधिकाऱ्यांच्या नावाने लाच घेतल्याप्रकरणी जळगाव येथील लाच लुचपत विभागाच्या पथकाने दोन खासगी एजंटांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. खासगी एजंटावर कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

आज २३ नोव्हेंबर रोजी खेडी बु. ता.जळगाव येथील एका तक्रारदाराने साधारण प्रवासी बस विकत घेतली असून सदरची बस तक्रारदार यांचे वडिलांचे नावावर हस्तांतर करण्याच्या मोबदल्यात आरोपी क्र. १ श्री.शुभम राजेंद्र चौधरी, वय-२३, व्यवसाय – RTO एजंट, जळगाव खाजगी इसम, राहणार कोल्हे हिल्स, गॅस गोडाऊन जवळ, जिजाऊ नगर, जळगाव व आरोपी क्र. २ श्री.राम भिमराव पाटील, वय -३७, व्यवसाय – RTO एजंट, जळगाव खाजगी इसम, राहणार अनुराग स्टेट बँक कॉलनी, महाबळ, जळगाव या दोघांनी RTO कार्यालयातील अधिकाऱ्यांचे नावे तक्रारदार यांचेकडे १० हजार रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाचेची रक्कम स्वतःआरोपी क्रं.१ यांनी RTO कार्यालय जळगावचे आवारात पंचासमक्ष स्वीकारली म्हणुन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा यशस्वी करणेकामी जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पोना.मनोज जोशी, पोना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे.

लाच लुचपत विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे कि, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव. दूरध्वनी क्र. ०२५७ – २२३५४७७ मो.क्रं. ८७६६४१२५२९ , टोल फ्रि क्रं. १०६४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button