ताज्या बातम्या

Breaking News : पंचायत समितीचा कनिष्ठ लिपिक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

जळगाव – पंचायत समिती कार्यालय, जामनेर येथील कनिष्ठ लिपिकास ३ हजार रुपयाची लाच स्वीकारतांना लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांचे गाईचा गोठा शेडचे बांधणीचे प्रकरण मंजुर झालेले असुन सदर शेडच्या बांधणीचे काम सुरु करण्यासाठी लागणारी वर्क ऑर्डर मिळवुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आरोपी वसंत पंडीत बारी, वय-५३, व्यवसाय-नोकरी, कनिष्ठ लिपीक पंचायत समिती कार्यालय,जामनेर, राहणार शेंदुर्णी ता.जामनेर जि.जळगाव यांनी ३ हजार रुपयाची लाच आज १३ जानेवारी रोजी पंचायत समिती कार्यालय, जामनेर येथे स्वतः बसत असलेल्या कक्षात स्वीकारली म्हणुन लाच लुचपत विभागाच्या जळगाव पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सापळा यशस्वी करणेकामी जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पोना.मनोज जोशी, पोना.सुनील शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे.

लाच लुचपत विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे कि, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव. दूरध्वनी क्र. ०२५७ – २२३५४७७ मो.क्रं. ८७६६४१२५२९ , टोल फ्रि क्रं. १०६४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button