आपला जिल्हाक्राईमताज्या बातम्या

Breaking News : १५ हजारांची लाच भोवली ; पोलिस नाईक एसीबीच्या जाळयात

अमळनेर – एका गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिस तपासात मदत करण्यासाठी १५ हजारांची लाच मागणी करून लाच स्वीकारणार्‍या अमळनेर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक भास्कर चव्हाण यास जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने राहत्या घरी आज शनिवार रोजी सांयकाळी अटक केली आहे.

सदर कारवाई आज शनिवार २३ रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आल्याने पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.

अमळनेर तालुक्यातील पाडसे येथील तक्रारदार यांनी तक्रार दिल्यानुसार तक्रारदाराचे वडील व भाऊ यांचे विरुध्द मारवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असुन सदर गुह्यात मदत करून सदर गुह्याचे चार्जशीट लवकर पाठविण्याच्या मोबदल्यात आरोपी लोकसेवक मारवड पोलिस स्थानकात नेमणूक असलेले पोलिस नाईक भास्कर नामदेव चव्हाण, वय-५१, रा. जुनी पोलिस लाईन, अमळनेर, ता.अमळनेर, जि.जळगाव, वर्ग-३ यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी केली व सदर लाचेची रक्कम स्वतःआरोपी लोकसेवक यांनी जुनी पोलीस लाईन,अमळनेर येथे पंचासमक्ष स्वीकारली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा यशस्वी करण्यासाठी जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, सफौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पोना.मनोज जोशी, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.प्रदिप पोळ यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे.

लाच लुचपत विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे कि, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव. दूरध्वनी क्र. ०२५७ – २२३५४७७ मो.क्रं. ८७६६४१२५२९ , टोल फ्रि क्रं. १०६४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button