ब्रेकिंग

Breaking News : चाळीसगाव पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्याला ५०० रुपयाची लाच भोवली

लोकनायक न्यूज नेटवर्क

चाळीसगाव – लाच लुचपत विभागाकडे प्राप्त तक्रारीनुसार तक्रारदार यांची मौजे चाळीसगाव येथील शेत जमीन लाभ क्षेत्रात येत नसल्याबाबत ‘ना हरकत दाखला’ उपविभागीय अधिकारी, लघू पाटबंधारे बांधकाम उपविभाग, पाचोरा यांच्या कडून तयार करून देण्यासाठी ५०० रुपयांची लाचेची मागणी केली. त्या अनुषंगाने सापळा कारवाई केली असता आलोसे यांनी आज दि. २८ मे रोजी ५०० रु ची लाच स्वीकारली असता धुळे येथील पथकाने आपल्या ताब्यात घेतले.

५८ वर्षीय पुरुष तक्रारदाराकडून आरोपी सुरेश बेनिराम वाणी वय ५८ वर्ष पद- चौकीदार, वर्ग ४, लघु पाटबंधारे कार्यालय चाळीसगाव जि. जळगाव, रा.दगडी बिल्डिंग 3 रा मजला नारायण वाडी, चाळीसगाव यांनी ५०० रु. ची लाच स्वीकारली आहे. दरम्यान आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सापळा यशस्वी करण्यासाठी धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, कर्मचारी राजन कदम, कैलास जोहरे, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भुषण खलानेकर, भूषण शेटे, चालक सुधीर मोरे यांच्या पथकाने कर्तव्य बजावले.

लाच लुचपत विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे कि, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास अँन्टी करप्शन ब्युरो, धुळे दुरध्वनी क्रं. 02562-234020, मोबा.क्रं. 9922447946, 9657009727, टोल फ्रि क्रं.1064 यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे