महाराष्ट्र

मानव अधिकार फाउंडेशनच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी पल्लवी प्रकाशकर

शहादा – शहादा येथील सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहणाऱ्या अवंतिका फाउंडेशनच्या संस्थापिका पल्लवीताई प्रकाशकर यांची नुसतीच मानव अधिकार फाउंडेशनच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा पदी निवड करण्यात आली. त्यांची ही निवड मानव अधिकार फाऊंडेशनचे प्रदेश अध्यक्ष प्रमोद फुलसुंदर व महासचिव सौ.सुनीता गोडसे यांनी नियुक्ती पत्राद्वारे केली.

मानव अधिकार फाऊंडेशन भारतचे नियम व आदेशाचे पालन करून समाजातील सर्व मानवी उत्पीडीत घटकांना योग्य तो न्याय मिळवून देण्यास सदैव तत्पर राहील, तसेच आपल्या कार्यात एकनिष्ठ राहून संविधानिक व न्याय व्यवस्थेच्या नियमांनुसार योग्य ती मदत करेल व यामध्ये कोणत्याही मानवी अधिनियमाची पायमल्ली होवू न देता प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव नेहमी कटिबध्द राहील. असे पल्लवी प्रकाशकर यांनी याप्रसंगी सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी व मित्र परिवाराने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच अमळनेर येथील युवा सामाजिक कार्यकर्ता शिवाजी महाजन (पत्रकार) यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे