जळगाव जिल्हा

महावितरण ची महिला तंत्रज्ञ १० हजार घेतांना लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

जळगाव – जळगाव महावितरण कंपनीत कार्यरत विरिष्ठ महिला तंत्रज्ञ सौ.शोभना दिलीप कहाने, वय-५६, व्यवसाय-सिनीयर टेक्नीशियन, वर्ग ३, म.रा.वि.वि.कंपनी मर्यादीत जोशीपेठ युनिट,जळगाव. रा.प्लॉट नं.२८, गट नं.५०१, पवन नगर, ममुराबाद रोड, जळगाव. ता.जि.जळगाव यांना लाच लुचपत विभागाने १० हजार रुपयाची लाच घेतांना रंगेहात जाळ्यात अडकवले.

जळगाव विभागाच्या टीम ने केलेल्या कारवाईत ६४ वर्षीय पुरुष तक्रारदार रा.जळगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तक्रारदार यांचे घरगुती मिटर कमर्शियल न करता व दंड न करण्याच्या मोबदल्यात आरोपी यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे १० हजार रूपयांची लाचेची मागणी केली. सदर लाचेची रक्कम आरोपी यांनी पंचासमक्ष म.रा.वि.वि.कंपनी लि.दिक्षीतवाडी जळगाव येथील कार्यालयात स्वीकारली.

सदर कामगिरी आज दि. १२ एप्रिल रोजी लाच लुचपत विभागाच्या जळगावच्या पथकातील पोलिस उप अधीक्षक गोपाल ठाकुर, पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक निलेश लोधी, पो.हे.कॉ.दिनेशसिंग पाटील, पो.हे.कॉ. अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ यांच्या पथकाने केली. त्यांना पोलिस अधीक्षक सुनील कडासने, नाशिक परिक्षेत्र, निलेश सोनवणे अपर पोलीस अधीक्षक, मा.श्री.विजय जाधव पोलीस उपअधीक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

लाच लुचपत विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे कि, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव, अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव दुरध्वनी क्रं. 0257-2235477 , मोबा.क्रं. 9607556556  यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे