धरणगाव

राष्ट्रवादी वर्धापन दिनी जेष्ठ शिवसैनिकाचा राष्ट्रवादीत प्रवेश

धरणगाव – आज दि. १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदनाचा कार्यक्रम धरणगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय येथे साजरा करण्यात आला. माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी झालेल्या बैठकीत आगामी धरणगाव नगरपालिकेच्या येवू घातलेल्या निवडणुकांबाबत चर्चा विनिमय करण्यात आले.

प्रसंगी निशाणे गावाचे जेष्ठ शिवसैनिक दगा जिवराम पाटील यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी सांगितले कि, “संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी खर्ची घातले परंतु योग्य तो न्याय मिळाला नाही. माझा मुलगा सचिन पाटील कट्टर शिवसैनिक होता. त्याने मानसिक तणावामुळे आत्महत्या केली. यावेळी सांत्वन करण्यासाठी गुलाबराव पाटील आले असता त्यांनी २ लाख रु. आर्थिक मदत करेन असे आश्वासन दिले. मात्र ते पूर्ण केले नाही. आम्ही वृद्ध दाम्पत्य आणि माझी विधवा सून आम्हाला आजपर्यंत संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देखील मिळवून दिला नाही. मला राष्ट्रवादीने न्याय दिला आणि आमचे संजय गांधी निराधार योजनेत नाव समाविष्ट केले. राष्ट्रवादीने वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे मी आज राष्ट्रवादी वर्धापन दिना निमित्त राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचे दगा पाटील यांनी सांगितले.

यावेळी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, जेष्ठ नेते मोहन नाना, तालुका अध्यक्ष धनराज माळी सर, कार्याध्यक्ष अरविंद देवरे, डॉ मिलिंद डहाळे, शहर अध्यक्ष निलेश चौधरी, युवक अध्यक्ष संभाजी कंखरे, युवक उपाध्यक्ष सागर वाजपेयी, युवक जिल्हा उपाध्यक्ष शरद पाटील, अमोल हरपे, भूषण पाटील, मेघराज पाटील, नईम काजी, दगा पाटील निशाणे, अशोक जाधव, उत्तम भदाणे बिलखेडा, भूषण पाटील, दिनेश भदाणे आदी उपस्थित होते.

पहा बातमीचा व्हिडीओ –

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे