महाराष्ट्र

ओबिसी नेत्यांना मिळणाऱ्या धमक्या सहन केल्या जाणार नाहीत – आत्माराम जाधव

लोकनायक न्यूज नेटवर्क

पुसद – ओबिसींचे राष्ट्रीय नेते, अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक, अध्यक्ष राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.ना.छगनराव भुजबळ साहेब व ओबिसी आरक्षणासाठी झटणा-या राज्यातील ओबिसी नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे फोन येत असल्याचे वृत्त नुकतेच विविध टि.व्ही.चॕनेलवर पहायला मिळाले. शासनाने व पोलीस प्रशासनाने अशा धमक्या देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचेवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी करीत ओबीसी नेत्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या सहन केला जाणार नाही असा इशारा अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष आत्माराम जाधव यांनी दिला आहे.

देशातील आरक्षण संपुष्टात आणण्याचा काही लोकांचा डाव आहे. त्यांचा तो अनेक वर्षांपासूनचा डाव मा.ना.भुजबळ साहेब, मा.ना.वडेट्टीवार साहेब व इतर ओबिसी नेत्यांमुळे आजपर्यंत यशस्वी झाला नाही. यामुळे आता त्यांनी ओबिसी नेत्यांना फोनवर धमक्या देण्याचे उपदव्याप सुरु केले असावेत. पण मा.ना.भुजबळ साहेब व इतर सर्व ओबिसी नेते अशा पोकळ धमक्यांना व धमकी देणाऱ्यांच्या बापालाही घाबरणारे नाहीत. हे नेते आमच्या ओबिसींचे वाघ आहेत. हे लक्षात घ्यावे आणि आता संपुर्ण ओबिसी जनता आमच्या नेत्यांच्या पाठिशी आहे. यापुर्वी काही ओबिसी नेत्यांना अडचणीत आणण्याचे, संपविण्याचे कटकारस्थानं या राज्यात, देशात झालेले आहेत. यामुळे ओबिसी आरक्षण विरोधकांची हिम्मत वाढलेली दिसते. अशावेळी सर्व ओबिसी नेते व कार्यकर्ते यांनी पक्ष, संघटना सर्व बाजुला ठेऊन एकत्रितपणे या आरक्षण विरोधी शक्तींचा सामना करणे गरजेचे आहे. सर्व ओबिसी जनता जर रस्त्यावर उतरली तर या आरक्षण विरोधी शक्तींना पळता भुई थोडी होईल. इतरांना आरक्षण मिळत असेल तर आमच्या नेत्यांचा व आम्हा ओबिसींचा त्याला विरोध नव्हता व नाही. पण ओबिसिच्या ताटातील घास कोणी ओढून घेण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्याला ओबिसी नेते व जनता प्रखर विरोध केल्याशिवाय रहाणार नाही. आमच्या नेत्यांना धमक्या देऊन आमच्या नेत्यांची किंवा आमची मानसिकता बदलेल असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी भ्रमात राहू नये. तुम्ही आमच्या नेत्यांना धमक्या देण्याची हिम्मत करत असाल तर संपुर्ण ओबिसी तुमच्या धमक्यांना न घाबरता तुम्हाला संविधानाच्या चौकटीत राहून सामाजीक, राजकीय क्षेत्रात अद्दल घडविल्याशिवाय रहाणार नाही. हे लक्षात घ्यावे. यापुढे जशास तसे प्रतिउत्तर दिले जाईल. यामुळे आमच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना धमक्या देण्याच्या भानगडीत कोणी पडू नये असे आवहान ओबिसी विरोधकांना जाधव यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे