धरणगाव

समस्त पाटील समाज पंच मंडळातर्फे अँड संजय महाजन यांचा सत्कार

धरणगाव – येथील भूमिपुत्र अँड.संजयभाऊ महाजन यांचे अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदान सर्वांना परिचित आहे. भाजप पक्षाच्या माध्यमातून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतांना अतिशय कमी फरकाने त्यांचा पराभव झाला होता. भाजप पक्षाच्या वतीने अनेक आंदोलनात अँड.संजयभाऊ महाजन नेहमीच अग्रेसर असतात. भाजप तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली होती. याच कार्याची दखल घेऊन पक्षाच्या वतीने त्यांना भाजप ओबीसी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, त्या बद्दल समस्त पाटील समाज पंच मंडळ (लहान माळी वाडा परिसर) धरणगाव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला, त्या निमित्ताने समाजाचा वतीने समाजाचे पंच मंडळ यांचा हस्ते सत्कार अँड.संजयभाऊ महाजन यांचा करण्यात आला.

याप्रसंगी जेष्ठ संचालक माधवराव पाटील, समाजाचे अध्यक्ष भिमराज पाटील, उपाध्यक्ष दिलीपबापू पाटील, खजिनदार लक्ष्मण पाटील, सचिव महेश्वर पाटील, संचालक मोहन पाटील, कैलास पाटील, गणेश पाटील, आनंद पाटील (पहेलवान), जितेंद्र पाटील (महाराज) आदी उपस्थित होते. प्रसंगी पुढील वाटचालीसाठी समस्त पाटील समाज पंच मंडळ (लहान माळी वाडा परिसर) यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. सत्काराला प्रतिउत्तर देत अँड.संजयभाऊ महाजन यांनी आभार मानतांना सागितले की, मी समाजाच्या विकास कामांसाठी व अडी-अडचणी सोडवण्यासाठी आपल्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून प्रयत्न करील, असे वचन समाजाच्या पंच मंडळास त्यांनी दिले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे