जळगाव जिल्हा

मुक्ताईनगरचे गटविकास अधिकारी यांचेवर कारवाई करण्याची पत्रकार संघाची मागणी

लोकनायक (प्रतिनिधी – प्रदीप महाराज)

मुक्ताईनगरचे – येथील गटविकास अधिकारी संतोष नागटीलक यांच्या कडून वृत्तसंकल करण्यास गेलेल्या पत्रकारांस दमबाजी करत माझ्या बद्दल बातमी लावायला कोणी सांगितले. आताच तुझ्यावर गुन्हा दाखल करतो या भाषेत आवाज दडपण्याचा व लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला. या कृत्यामुळे पत्रकारांमध्ये घबराटीचे, दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अश्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत अधिक असे, मुक्ताईनगर येथील मंडे टू मंडे चे स्थानिक पत्रकार अक्षय काठोके यांनी चांगदेवचे ग्रामसेवक रामकृष्ण चौधरी यांच्या कार्यालयात हजर राहत नाही, नागरिकांना अर्वाच्य भाषेत बोलतात, नियमानुसार ड्युटीच्या गावी राहणे बंधनकारक असतांना ते ड्युटी च्या गावी न राहता बाहेर गावावरून ये-जा करता अशा मनमानी कारभाराबाबत व नागरिकांची दिशाभूल करीत असलेबाबत गटविकास अधिकारी संतोष नागटीलक यांच्या निदर्शनास आणून दिला मात्र, लक्षात आणून देऊनही गटविकास अधिकारी संतोष नागटीलक हे नेमक्या कोणत्या हेतूने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करुन संबधित ग्रामसेवकाची पाठराखण करीत आहेत. प्रतिक्रिया मागितली असता त्यांना या गोष्टीचा राग येऊन पत्रकार काठोके यांना अर्वाच्च भाषा वापरत तुला मध्ये कोणी येऊ दिल, आणि माझ्या विरुद्ध बातम्या लावायला तुला कोणी सांगितलं ? तुझ्यावर आताच गुन्हा दाखल करेल. अशी दमदाटी करत अपमानास्पद वागणूक देत धमकी दिली. एका वृत्तसंकलंन करणाऱ्या पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सदरील अधिकाऱ्याकडून केला गेला.

सदर गट विकास अधिकारी यांच्या निषेधार्थ रावेर तहसीलदार कार्यालयात नायब तहसिलदार श्री पवार साहेब यांना त्या गटविकास अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले.

प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार रावेर तालुका संघाचे तालुकाध्यक्ष विलास ताठे, उपाध्यक्ष संतोष नवले, सचिव योगेश सैतवाल, संघटक प्रदीप महाराज पंजाबी, सहसंघटक विनायक जहुरे, म.रा.पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा रावेर शहराध्यक्ष विनोद कोळी, शेख अजीज, शेख शरीफ, प्रमोद कोंडे, संजय पाटील, अतुल धंजे, सुमित पाटील, भूषण सोनवणे, महेंद्र पाटील, उमेश कोळी, संतोष पाटील, राजेंद्र अटकाळे, भीमराव कोचुरे, जगनाथ लुल्हे, संभाजी पाटील, आकाश भालेराव तसेच रावेर तालुक्यातील पत्रकार बंधू यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे