धरणगाव तालुका

पिंप्री खुर्द येथे नव्यागटारीत चाक फसल्याने ट्रक पलटी, अनर्थ टळला

पिंप्री खुर्द ता धरणगाव येथे दोन वर्षे पासून रस्त्याचे काम सुरु आहे. रस्त्याला लागून मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटारी बांधकामासह धुळे येथील ठेकेदाराने हे काम घटले आहे. मुसली फाटा ते अमळनेर रस्त्याचे हे काम मुदत पूर्ण होवून देखील अद्याप सुरुच आहे. एप्रिल महिन्यात ग्रामपंचायत सदस्य सुनिल बडगुजर सर यांनी निकृष्ट कामाबद्दल ग्रामसेवक सुनील बोरसे यांच्याशी सम्पर्क साधून पूर्वकल्पना दिली होती. तसेच ठेकेदारास देखील सूचना देण्यात आल्यात. परंतु कामात सुधारणा झाली नाही. त्या नंतर अवघ्या १५ ते २० दिवसाच्या कालावधी नंतर विशाल वेल्डिंग जवळ रेती ने भरलेला ट्रॅक अक्षरशः गटारीत फसला होता. ही घटना ताजी असताना आज दि ११ जून शुक्रवार रोजी सकाळी ८ वाजेच्या च्या दरम्यान कृषी केंद्राचे साहित्य घेऊन आलेला ट्रक एम एच 04 एच 6745 हा नव्यानेच बांधकाम पूर्ण झालेल्या गटारीत रिव्हर्स घेत असताना पलटी झाला. प्रत्यक्ष दर्शी यांच्या नुसार वाहन चालक हा थोडक्यात बचावला तसेच सकाळी गर्दी कमी असल्याने अनर्थ टळला. सुरू असलेल्या कामा बद्दल संबंधितांनी लक्ष देणे आवश्यक आहे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गावात अनेक दुकाने असून साहित्य घेऊन जाणारी मोठ मोठी वाहने गावात प्रवेश करीत असतात. अश्या प्रकारे जर आतापासूनच वाहने गटारीवर लोटांगण घालत असतील तर पुढे काय होईल? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. (व्हिडीओ)

ट्रक माझ्या समोर पलटी झाला . यात ड्रायव्हर हा अगदी थोडक्यात बाचावला गेला . सुरू असलेल्या गटारी च्य कामात योग्य मटेरियल वापरणे आवश्यक आहे. काम जर योग्य असते तर हा प्रश्न निर्माण झालाच नसता. गटारीच्या दुसऱ्या बाजूने वापर नसताना ही मोठे मोठे (होल) छिद्र पडत आहे. वेळीच उपाय योजना न झाल्यास गावकरी यांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

अरुण पवार – माजी सरपंच

मी वेळोवेळी या प्रकारा बाबत फोन लावून, प्रत्यक्ष भेटून ,या गटारीच्या कामा संदर्भात माहिती तथा पूर्वकल्पना दिली होती .जुन्या गटारीवर नवीन गटारी ओतणेचे काम सुरू आहे. आज सकाळी जो ट्रक पलटी झाला यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पण जर असा प्रकार घडला तर मग याला जबाबदार कोण ?

सुनील बडगुजर सर – ग्रामपंचायत सदस्य

 

सदर काम हे अत्यंत बोगस प्रकारचे आहे. गावातील बांधव शेती अवजारे तसेच धान्य खरेदी विक्री साठी ट्रॅक्टर घेऊन जात असतात. ‘खड्ड्याची गटार’ आतापासून वाहन गिळत आहे. मी वेळोवेळी फोन करून सुद्धा संबंधित अधिकारी फोन उचलत नाहीत.वेळीच योग्य पाऊल न उचलल्यास गावाला घाणीच्या साम्राज्य चा सामना करावा लागू शकतो.

मनोज पांडे – माजी सरपंच

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे