जळगाव जिल्हा

सैन्य भरतीबाबत २८ मे रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव

जळगाव – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील युवक/युवतींसाठी २८ मे २०२१ रोजी भारतीय संरक्षण दलातील विविध संधी (सैन्यात भरती होण्यासाठी पात्रता) या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत करण्यात आले आहे. अशी माहिती डॉ.राजपाल म.कोल्हे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी दिली आहे.

या मार्गदर्शन सत्रात श्री.नारायण पाटील, जिल्हा सैनिक कार्यालय, जळगाव हे मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन गुगल मिटवर करण्यात आले असून सहभाग घेणाऱ्यांना https://meet.google.com/edq-tiaw-wuv या लिंक वरून सहभागी होता येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक/युवतींनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ.कोल्हे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे