धरणगावब्रेकिंगराजकीय

Breaking News : धरणगाव शहर शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत

संपादकीय विशेष

धरणगाव – जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील शिवसेनेचे, मुख्यमंत्री शिवसेनेचे, धरणगाव नगरपालिकेत सत्ता शिवसेनेची असे असतांना स्थानीक धरणगाव शहरातील निष्ठावान पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याने अनेक निष्ठावान नाराज आहेत. त्यांची नाराजी त्यांनी लोकनायक न्यूज कडे व्यक्त केली असता, ‘आम्ही सध्या राजीनामे घेवून फिरत आहोत’ अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली.

धरणगाव शहरात सध्या नगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरु आहेत. अनेक वरिष्ठ पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक हे, हि कामे मंत्रालयातून पालकमंत्र्यांचे वजन वापरून खेचून आणत असल्याचा आव आणीत आहेत. आणि आम्ही निवडून येण्यासाठी पैसा खर्च केल्याच्या आविर्भावात काही नगसेवक कायमच असतात. ज्यांच्या जीवावर हि सत्ता उपभोगली जात आहे अश्या सर्वसाधारण कुटुंबातील कार्यकर्त्यांना वारंवार डावलले जात असल्याची भावना शिव सैनिकांमधून व्यक्त होत आहे. अनेकदा याबाबत वरिष्ठांकडे नाराजी व्यक्त करून देखील दखल घेतली जात नसल्याने नाईलाजास्तव कडवट निर्णय घेण्याच्या तयारीत हे निष्ठावान शिवसैनिक आहेत.

शहरातील काही पदाधिकारी पैश्यांच्या जोरावर व पदाच्या जोरावर खालच्या कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रयत्न करीत असतात. कायमच कार्यकर्त्यांना हीन वागणूक तर दिली जातेच शिवाय अपशब्द देखील वापरले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मागील काळात प्रत्येक सर्वसाधारण कार्यकर्त्याला नगरपालिकेच्या माध्यमातून छोटे – मोठे ठेके देण्याचे ठरले मात्र काही हावरट पदाधिकार्यांनी विरोध दर्शविल्याने आज आमच्यावर अन्याय झाला आहे.

मोठ मोठे पदाधिकारी मंत्री, संत्री अगदी घरातील निष्ठावान पक्ष सोडून गेलीत परंतु पक्ष स्थापनेपासून काम करीत असलेल्या कार्यकर्त्याने कधीही पक्षाच्या विरोधात जाण्याचा किंवा इतर पक्षाचा देखील विचार कधी केलेला नाही. असे असतांना वारंवार डावलण्यात येत असल्याने आम्ही राजीनामे देण्याच्या तयारीत आहोत अशी भावना शहरातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली.

शिवसेना पक्षाला सध्याच्या स्थितीत प्रमुख ताकदवर विरोधक अथवा विरोधी पक्ष सद्ध्या स्थितीत नाही. परंतु अशी ज्यावेळी परिस्थिती निर्माण होते त्यावेळी आपलीच मानसं आपली वैरी होवून बंड करून उठतात. नुकतेच ग्रामपंचायत निवडणुकीत हे बघायला मिळाले आहे. खुद्द पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या गावातच हि परिस्थिती होती. अशीच काहीसी परिस्थिती धरणगाव शहरात बघावयास मिळते कि काय ? आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ए विरुद्ध शिवसेना बी अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यात काही नवल वाटायला नको असे देखील राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे