ब्रेकिंग

Breaking News भाजपला पुन्हा धक्का ; जळगावच्या तीन नगरसेवकांनी केला शिवसेनेत प्रवेश

लोकनायक न्यूज नेटवर्क

जळगाव – जळगाव महापालिकेत भाजपमध्ये उभी फूट पाडून सत्ता काबीज करणार्‍या शिवसेनेने आज पुन्हा एकदा भाजपला हादरा दिला असून आज तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नुकतेच तीन दिवसांपूर्वीच मुक्ताईनगरच्या सहा भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर आज महापालिकेतील तीन नगरसेवकांनी वर्षा बंगल्यावर मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

अलीकडेच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तर चार नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. यानंतर आज दुपारी काही नगरसेवक हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती. ५७ नगरसेवकांसह भाजप कडे बहुमत होते. आता ३० नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आता भाजप कडे १६ नगरसेवक शिल्लक आहेत.

जळगाव महापालिकेतील सुरेश सोनवणे, सौ.शोभा बारी, शेख हसीना शेख शरीफ यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे. यासंदर्भात शिवसेनेचे गटनेते, तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक विश्वनाथ पाटील यांनी सदर वृत्तास दुजोरा दिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे