धरणगाव

धरणगाव येथे विविध संघटनांकडून गुलाबराव वाघ यांचा सन्मान

धरणगाव – जळगाव लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित सहसंपर्क प्रमुख भाऊसाहेब गुलाबराव वाघ यांनी तब्बल १८ वर्ष शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून यशस्वी कारकिर्द सांभाळली. म्हणूनच, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांनी श्री.वाघ यांची पक्ष, संघटनेची कारकीर्द बघूनच त्यांना जळगांव लोकसभा सहसंपर्क प्रमुख पदी नियुक्ती केली.

यानिमित्ताने नवनिर्वाचित नियुक्ती झाल्याबद्दल श्री.वाघ यांचा जळगांव जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे, तालुकाध्यक्ष किशोर भदाणे, धरणगाव तिळवण तेली तेलाठी परिसरातील पंचमंडळ भिका चौधरी, भिका पितांबर चौधरी, संजय वामन चौधरी, बापू चौधरी, राजेंद्र चौधरी, नगरसेवक भागवत चौधरी, नाना चौधरी, जितेंद्र देवराम चौधरी, राहुल प्रकाश चौधरी तसेच, माळी समाजध्यक्ष विठोबा नामदेव माळी, सचिव दशरथ बापू महाजन, उपाध्यक्ष निंबाजी माळी, डिगंबर महाजन, कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी सर, विजय महाजन, रामायण मढी उपाध्यक्ष संजय महाजन, योगराज खलाने आदी समाजबांधव व विविध संघटना, व पंच मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

    यासत्कार प्रसंगी श्री. वाघ यांनी कृतज्ञता व्यक्त करीत सांगितले की, मी सर्व समाजातील प्रत्येक घटकांसाठी, विकास कामासंदर्भात व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार, असेही यावेळी श्री.वाघ यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे