अ.भा.महात्मा फुले समता परिषदेची चाळीसगाव येथे बैठक संपन्न ; महामेळावा २२ मार्च रोजी जळगांवात

चाळीसगांव : अ. भा. महात्मा फुले समता परिषदेचा ओबीसी एल्गार महामेळावा २२ मार्च २०२५ रोजी संपन्न होणार आहे. सदर मेळाव्यास अ. भा. महात्मा फुले समता परीषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. छगनरावजी भुजबळ साहेब मार्गदर्शन करणार आहेत. ओबीसी एल्गार महामेळाच्या पूर्वतयारीसाठी आज दि.१०/०३/२०२५ रोजी चाळीसगाव येथे नियोजन बैठक घेण्यात आली. बैठकीत क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मुर्ती प्रित्यर्थ माल्यार्पण करण्यात आले, व मेळाव्याच्या नियोजना बाबत जिल्हा अध्यक्ष सतिष महाजन सर, ता. अध्यक्ष कैलास जाधव व सत्यशोधक भगवान रोकडे यांनी जळगाव येथे झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहीती दिली. सदर नियोजन बैठकीत तालुका नियोजन कमेटी स्थापन करण्यात आली, नियोजन कमेटी व समता परीषद तालुका कमेटी यांनी तालूक्यातील सर्व गावात दि. १३ मार्च पासून मेळाव्याचे अहवान करणेसाठी बैठकीचे नियोजन करावे असे ठरले, मेळाव्यास आर्थिक नियोजनासाठी मा. बापूसाहेब अशोकजी खलाणे यांनी जळगाव येथील मेळाव्यासाठी एक लाख रूपये व चाळीसगांव शहरात मेळाव्याच्या प्रसिध्दीचे बॅनर लावणेची जबाबदारी घेतली, तसेच आप्पासाहेब उध्दवराव माळी सर व आर के माळी सर यांनी प्रत्येकी पंचविस हजार रूपये मदत देण्याचे घोषीत केले, तसेच बाळासाहेब महाजन यांनी पाच हजार शंभर रूपये मदत रोख स्वरूपात दिली, व बैठकीत हजर असलेल्या श्री. सचिन बाविस्कर, श्री. आत्माराम महाजन पिलखोड, श्री देविदास भाऊ माळी, श्री आबा महाजन (पहिलवान) पातोंडा, श्री प्रकाश महाजन पिंपळवाड म्हाळसा, श्री गोकूळ रोकडे सायगाव, श्री पि.ओ. महाजन श्री आप्पा महाजन टाकळी, श्री प्रशांत महाजन सर दरेगाव, वरील सर्वानी आपल्या गावातील व परीसात वाहनाच्या व्यवस्तेची जबाबदारी घेतली, बैठकीस उपस्थीत श्री बापू महाजन पोहरे, नानासो. श्री भिमराव खलाणे, श्री नूंदू माळी, श्री दत्तात्रय महाजन, श्री राकेश माळी सायगाव,श्री नरेंद्र महाजन, श्री अभीजित खलाणे, श्री हर्षल दादा माळी चाळीसगाव, श्री उमेश दादा महाजन पातोंडा, श्री. यज्ञेश दादा बाविस्कर पिलखोड, श्री विनायक माळी पिंपळवाड म्हा.,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते,ष हितचिंतक, भुजबळ समर्थक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, ओबीसी संघटनांचे पदाधिकारी हे उपस्थीत होते.