ताज्या बातम्या

अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची यशस्वी सांगता ; कुणबी पाटील पंच मंडळाची ३६ वर्षांपासूनची परंपरा

धरणगाव — येथील समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळ लहान माळी वाड्याच्या वतीने मागील ३६ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची आज संत तुकाराम महाराज बिजेनिमित यशस्वी सांगता झाली.

दि.२०/०३/२०२४ ते आज दि.२७/०३/२०२४ या कालावधीत अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दररोज सकाळी ५ ते ६ दरम्यान काकडा आरती, सायंकाळी ६ ते ७ दरम्यान हरिपाठ आणि रात्री ८ ते १० दरम्यान कीर्तन सेवा असे भरगच्च कार्यक्रम संपन्न झाले. आज शेवटच्या दिवशी सप्ताहाचे संयोजक ह.भ.प.प्रा.सी.एस. पाटील यांनी केलेल्या काल्याच्या कीर्तनातून सर्वांनी भक्ती आणि शक्तीचा अनोखा मेळ म्हणजे तुकोबाराय आणि शिवराय हे महात्म्य समजून घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना खजिनदार लक्ष्मणराव पाटील यांनी समाजाची प्रदीर्घ परंपरा व लोकोपयोगी कार्याचा आढावा मांडला. सप्ताहाला उपस्थित अतिथी मान्यवरांचा सत्कार तसेच मान्यवरांच्या हस्ते स्कॉलरशिप, एमटीएस, १०वी, १२ वी व उच्चशिक्षित गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार संपन्न झाला. सायंकाळी अतिशय आनंदात आणि उत्साहात जगद्गुरू संत तुकाराम महाराज बिजेनिमित आयोजित पालखी सोहळ्याला भाविकांनी उदंड प्रतिसाद दिला. या देखण्या सोहळ्याला ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचा समाजाच्या वतीने ऋणनिर्देश व्यक्त करण्यात आला. यामध्ये कीर्तनकार, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, विणेकरी, भालदार, चोपदार, संत सावता माळी भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, परिसरातील सर्व समाज अध्यक्ष, पत्रकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, मंडप, इन्व्हर्टर, स्वयंपाक आदी सर्व सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा समावेश होता. अतिथी मान्यवरांच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांचे तोंडभरून कौतुक केले व सदिच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी महायुतीच्या जळगाव लोकसभा उमेदवार स्मिता वाघ, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, उ.बा.ठा.सेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, प्रा.आर.एन.महाजन सर, प्रा.डी.आर.पाटील सर, मोहन पाटील सर, कडु महाजन, रतिलाल चौधरी, शिरीष बयस, विनय भावे, विजय महाजन, विलास महाजन, राजेंद्र ठाकरे, चंदन पाटील, अमोल हरपे, मनोज पाटील, खुशाल चव्हाण यांच्यासह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा सेना, काँग्रेस इ.विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील पी.डी.पाटील, हेमंत माळी, कैलास पवार, सुधाकर मोरे, डॉ.धनंजय पाटील, डॉ.अतुल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणबी पाटील पंच मंडळाचे अध्यक्ष भिमराज पाटील, उपाध्यक्ष दिलीप पाटील, सचिव महेश्वर पाटील, सहसचिव दिनेश पाटील, जेष्ठ संचालक माधवराव पाटील, चुडामण पाटील, राजेंद्र पाटील, दत्तात्रय पाटील, मोहन पाटील, कैलास पाटील, किशोर पाटील, अशोक पाटील, वाल्मीक पाटील, परशुराम पाटील,आनंद पाटील, मंगेश पाटील, जितु महाराज, अशोक झुंझारराव यांच्यासह तुकाराम महाराज बीज उत्सव समितीचे पंकज पाटील, समाधान पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भागवत महाजन, हरिष महाजन, सुमित महाजन, नयन चौधरी, रुपेश मराठे, सागर पाटील, प्रशांत पाटील, नकुल पाटील, हरिष पाटील, रितेश पाटील, गोपाल पाटील, अमोल पाटील, भूषण पाटील, हिमांशू पाटील, सुमित पाटील तसेच समाज बांधवांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खजिनदार लक्ष्मणराव पाटील यांनी तर आभार प्रदर्शन संचालक गणेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन समस्त कुणबी पाटील समाज अध्यक्ष व पंच मंडळ लहान माळी वाड्याच्या वतीने करण्यात आले होते. या दैदिप्यमान कार्यक्रमाला गाव परिसर व तालुक्यातील माता भगिनी, पुरुष बांधव, लहान मुले, युवक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Whatsapp group