ताज्या बातम्या

अडावद आरोग्य केंद्रांत क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध मोहीमेची कार्यशाळा संपन्न

चोपडा तालुक्यात दिनांक-13 क्षयरुग्न व सप्टेंबर 22 ते 30 सप्टेंबर202 दरम्यान कुष्ठरुग्न शोध मोहीम.

राज्य क्षयरोग कार्यालयाच्या आदेशानुसार, राज्यात क्षयरुग्न व कुष्ठरुग्न शोध मोहीम दिनाक-१३ सप्टेंबर ते दिनांक-३० सप्टेंबर २०२२ दरम्यान करण्यात येणार आहे. 

त्या अनुषंगाने जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.इरफान तडवी यांच्या सूचनेनुसार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा तालुक्यात देखील सदर सर्वेक्षण होणार असून, 

त्या पार्श्वभूमीवर आज दि.२५/०८/२०२२ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र- अडावद येथे क्षयरोग व कुष्ठरोग सर्वेक्षण बाबत प्रशिक्षण घेण्यात आले. सदर मोहिमेबाबत क्षयरोग प्रशिक्षण श्री किशोर सैंदाणे (STLS) व कुष्ठरोग प्रशिक्षण श्री.राजेंद्र जी. पाटील (PMW) यांनी घेतले. 

त्याचप्रमाणे श्री.किशोर सैंदाणे (STLS) यांनी सर्व समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) यांना Nikshay App मधील संशयित क्षयरूग्न नोंदीचे सखोल प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले.

 सदर प्रशिक्षणास प्रमोद पाटील, (STS) प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना पाटील, सर्व CHO, आरोग्य सेवक-विजय देशमुख,अविनाश चव्हाण,आरोग्य सहाय्यीका-शोभा चौधरी,सर्व आरोग्य सेविका,गट प्रवर्तक-संध्या बोरसे, शालिनी सोनवणे,सर्व आशा सेविका, सर्व स्वयंसेवक इ. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *