अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदी यांच्याहस्ते देशभरातील 508 रेल्वे स्टेशनचे भूमिपूजन
लोकनायक न्युज प्रतिनिधि उमेश कोळी, जळगांव
अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत आज देशभरातील 508 रेल्वे स्टेशनचे प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदी यांच्याहस्ते एकाचवेळी दूरदृष्यप्रणाली द्वारे भूमिपूजन संपन्न झाले, यावेळी रावेर लोकसभा क्षेत्रातील “मलकापूर रेल्वे स्टेशन” येथे आयोजित कार्यक्रमात खा. रक्षाताई खडसे यांनी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री.चैनसुख संचेती, आमदार श्री.राजेश एकडे व डॉ.राजेंद्र फडके यांच्यासह उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले.अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत “मलकापूर” रेल्वे स्टेशनची निवड झालेली असून, स्टेशनवर विविध विकास कामे करणेसाठी रू.18.521 कोटी मंजूर झालेले आहे. त्यांतर्गत छत नूतनीकरण, 12 मी. फूट ओव्हर ब्रीज, डिजिटल व्हिडिओ स्क्रीन, पार्किंग व्यवस्था, वेटींग रुम नूतनीकरण, २ लिफ्ट, आधुनिक प्रसाधनगृह, दक्षिण बाजूने नवीन प्रवेशद्वार अशी विविध विकास कामे मलकापूर स्टेशनवर करण्यात येऊन, प्रवाश्यांना आधुनिक सुविधा पुरविण्यात येणार आहे.यावेळी खा. रक्षाताई खडसे यांच्यासह भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री.चैनसुख संचेती, आमदार श्री.राजेश एकडे, डॉ.राजेंद्र फडके पद्मश्री डॉ.रविंद्रजी कोल्हे, पद्मश्री सौ.स्मिताताई कोल्हे, वीरपत्नी श्रीमती सुषमाजी संजयसिंह राजपूत, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.सचिन देशमुख, माजी जि.प.अध्यक्ष सौ.उमाताई तायड़े, श्री मोहनजी शर्मा, श्री.केदार एकड़े, श्री.बलदेवराव चोपडे, श्री.विजयराव जाधव, श्री.शंकरकाका पाटील, श्री.मिलिंद डवले, श्री.अविनाश कुलकर्णी, श्री.अशोक राजदेव, श्री.दामोदर लख़ानी, ॲड.सौ.अर्चना शुक्ला, सौ.अश्विनी साठे काकड़े, सौ.डॉ.सौ.नीलिमा झंवर, श्री.महेंद्र बुरड, श्री.अनिल कोचर, श्री.रामभाऊ झांबरे, श्री.विलासराव पाटील, श्री.अमृतभाऊ बोंबटकार, श्री.साहेबराव पाटील, श्री.दामोदर शर्मा, श्री.रंजितजी डोसे, श्री.विजय डागा, श्री.सुरेश संचेती, श्री.उमेश तकावले, श्री.अरविंद किनगे, श्री.योगेश पटनी, श्री.रमेशसिंह राजपूत, श्री.राजेंद्र खराडे, ॲड.म्हैसागर, श्री.विनोद आकोटकर, नोडल अधिकारी श्री.तरुणजी दंतोड़िया, सीनियर डीइएन श्री.रोहितजी मेहला, एसीएम श्री.आर.डी.क्षिरसागर, एसडीएम श्री.मनोज देशमुख, विधि अधिकारी श्री.विकास धुर्वे, सीसीआय श्री.प्रमोद सालुंखे, डीएसटीइ श्री.सुनील शर्मा, श्री.राकेश भावसार, श्री चंदनसिंह राजपूत ई उपस्थित होते.