आर्वी येथे आदर्श एकता सामाजिक संघटना महा. राज्या तर्फे लोक प्रबोधनकार संत गाडगे महाराज यांचा स्मृतिदिन संपन्न
*आदर्श एकता सामाजिक संघटना महा. राज्या तर्फे लोक प्रबोधनकार संत गाडगे महाराज यांचा स्मृतिदिन आर्वी येथे पार पडला.
वर्धा प्रतिनिधी / अर्पित वाहाणे
स्थानिक आर्वी त्रिशरण बुद्ध विहार आर्वी, भीमसैनिक अशोकराव कुंभारे परिसर आर्वी येथे लोकप्रबोधनकार, विज्ञानवादी,बुद्धीप्रामाण्यवादी गाडगेबाबांचा स्मृतीदिन त्यानिमित्त त्यांच्या कार्याला, विचारांना आणि स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यात आले.या वेळी गौतम अशोकराव कुंभारे यांनी संत गाडगे महाराज यांच्या जीवनातला कार्यावर बोलतांना संत गाडगे महाराज यांचे जीवन भारतातील जनतेसाठी किती महत्वाचे होते हे सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन शुभांगी गौतम कुंभारे यांनी केले तर आभार जया सरोदे यांनी केले या कार्यक्रमाला उपस्थित निर्मला कुंभारे, सुमन मसराम, चंदा डोंगरे, सुलुचना कुंभारे, चंदा सरोदे, कविता कर्नाके,मेघा सरोदे सीमा गोंडणे, छकुली माहुरे, मनोज गोंडणे मंगेश सरोदे, राहुल मनवर, नितीन, श्याम गोंडेलवार, सेजल डोंगरे,राकेश वर्टी, पूर्वेश गोंडाने, दिवेश कुंभारे,आदर्श कुंभारे,व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन आदर्श एकता सामाजिक संघटना महा. राज्य तर्फे करण्यात आले.