ताज्या बातम्या

खानदेशातील गुजर समाजाला आर्थिक महामंडळ मिळाल्याबद्दल चोपड्यात आनंदोत्सव..!

प्रतिनिधी विनायक पाटील

चोपडा – खानदेशातील गुजर समाजाला आर्थिक महामंडळ मिळाल्याबद्दल दोन्ही मंत्री, तसेच खासदार रक्षा खडसे, व अंबरनाथचे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या संयुक्त प्रयत्नांनी समाजाला मिळालेले हे महामंडळ आनंदाची बाब आहे. या कार्याबद्दल लोकप्रतिनिधींचे आभार मानण्यासाठी चोपडा नगरपालिकेजवळ आज दिनांक 11 रोजी दुपारी एक वाजता समाजातील सर्व पोट जातीं व लोकप्रतिनिधी यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.
दोडे गुजर संस्थांचे अध्यक्ष चंद्रशेखर युवराज पाटील, छन्नू झेंडू पाटील, जी टी पाटील, भाजपचे नेते लक्ष्मण पाटील धानोरा येथील जितेंद्र महाजन गजानन चौधरी संदीप गुजर आदींनी एकत्र येऊन या आनंदोत्सवात भाग घेतला.
समस्त गुजर समाजातील मान्यवरांनी प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यानंतर स्वाद्य मिरवणू किने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. मार्केट कमिटीचे सभापती नरेंद्र पाटील, संचालक गोपाल पाटील, नगरसेवक राजाराम पाटील, मा.उपनगराध्यक्ष विकास पाटील, गुजर संस्थांचे संचालक डी बी पाटील, डॉक्टर तृप्ती पाटील, दंत रोग तज्ञ डॉक्टर राहुल पाटील, कवी लेखक तथा साहित्यिक रमेश जे. पाटील, म. सभापती कांतीलाल पाटील, प्राध्यापक एस के पाटील, राजेंद्र पाटील (कल्याण), डॉक्टर अनिल रामदास पाटील, डॉक्टर पंकज पाटील, डॉक्टर पारस पाटील, किशोर पाटील (गोरगावले), संभाजी पाटील (आडगाव), मा.सभापती, सुनील महाजन, राजेंद्र गंगाधर पाटील (वेले), अरुण पाटील, कैलास पाटील, भिका पाटील, हिम्मतराव पाटील ( गरताड) गजानन पाटील, राजेंद्र पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. गुजर समाजाला सत्तर लाख रुपये समाज भवन साठी मिळाले आहेत लवकरच त्याचा भूमिपूजन समारंभ येत्या 13 तारखेला होणार असून यावेळी समाज बांधवांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन नरेंद्र पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *