गुड शेपर्ड स्कुलमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
धरणगाव – येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांनी राष्ट्रध्वजाचे पूजन केले. शाळेच्या प्राचार्या व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल सोनार यांनी केले. महाराष्ट्र दिनाचे महत्व सांगत असतांना संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी अनेक हुतात्म्यांचे योगदान आहे. आपण सर्वांनी महाराष्ट्र धर्म जोपासला व वाढवला पाहिजे, असे प्रतिपादन सोनार सरांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला माध्यमिक च्या मुख्याध्यापिका नाजनिन शेख, भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, रमिला गावित, ग्रीष्मा पाटील, पूनम कासार, शिरीन खाटीक, दामिनी पगारिया, नाजुका भदाणे, हर्षाली पुरभे, गायत्री सोनवणे, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, सागर गायकवाड हे शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल देशमुख हे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल सोनार यांनी केले.