गुलाबराव देवकरांचे गावागावात जल्लोषात स्वागत : वराड बुद्रुक व वराड खुर्दच्या ग्रामस्थांनी दिली ५१ हजाराची वर्गणी
प्रतिनिधि – विनोद रोकडे
विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचाराचा धरणगाव तालुक्यात सध्या नुसता झंझावात सुरू आहे. त्यांच्या प्रचार रॅलीचे आगमन होताच ढोल-ताशाचा गजर व फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण परिसर दणाणून निघत असून, गावागावात त्यांच्या स्वागताला मोठा जल्लोष होताना दिसत आहे.
गुलाबराव देवकर यांनी प्रचारात आघाडी घेत धरणगाव तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये प्रचार रॅलीदरम्यान गृहभेटींवर भर दिला आहे. मतदारांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न देखील ते करत आहेत. वराड बुद्रुक व वराड खुर्द, मुसळी, बोरखेडा, चिंचपुरा, चावलखेडे, हिंगोणे बुद्रुक व हिंगोणे खुर्द, कल्याणे खुर्द तसेच कल्याणे होळ आदी गावांनाही त्यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश चौधरी, धरणगाव तालुका प्रमुख जयदीप पाटील, जानकीराम पाटील, जनाताई पाटील, लीलाधर पाटील, स्वप्निल परदेशी, भागवत चौधरी, संतोष सोनवणे, अनंत परिहार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व्ही.डी.पाटील, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष धनराज माळी, युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, शहर अध्यक्ष लक्ष्मण पाटील, कार्याध्यक्ष अरविंदे देवरे, बाजार समितीचे संचालक दिलीप धनगर, रंगराव सावंत, रघुनाथ पाटील, तसेच मोहन पाटील, एन.डी.पाटील, मोहन पाटील, डॉ.नितीन पाटील, संजय पाटील (पिंपळे), सोनवदचे माजी सरपंच गुलाब पाटील, गंगापुरी येथील राजेंद्र पाटील, दिनकर पाटील, विजय पाटील, अनिल पाटील, खर्दे येथील योगेश पाटील, विजय पाटील, सुभाष पाटील, धानोरे येथील राजू ठाकरे, किशोर पाटील, रवी महाजन, संतोष सोनवणे, पष्टाणे येथील अभय पाटील, दिलीप पाटील, सुभाष ठाकरे, गौरव पाटील, चमगाव येथील शेखर कोळी, संदीप पाटील, प्रेमराज सावंत, डिगंबर सावंत, अंजनविहीरे येथील सरपंच गणेश पाटील, शरद पाटील, प्रदीप पाटील, महेश पाटील, राजेंद्र पाटील, संजय पाटील, महेश पाटील, कल्याणे येथील देवेंद्र देसले, संभाजी पाटील, राजू वाणी, भूषण पाटील, वासुदेव सपकाळे, मंगलसिंग पाटील, सुरेश पवार, साईनाथ पाटील, हेमंत पाटील, राहुल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, वाल्मीक पाटील, सौरव पाटील, गौरव पाटील, हिंगाणे येथील अजय पाटील, तुराब पिंजारी, जितेंद्र पाटील, तराब शहा, संजय महाजन आदी उपस्थित होते.
नेत्याला बळ देण्याचा छोटासा प्रयत्न
गुलाबराव देवकर यांना देणगी देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामाध्यमातून आपल्या नेत्याला बळ देण्याचा छोटासा प्रयत्न गावागावातून होताना दिसत आहे. धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक व वराड खुर्द या गावांमधुनही सुमारे ५१ हजार रूपयांची वर्गणी जमा करण्यात आली. याशिवाय चावलखेडे येथील राजू वाणी यांनी वैयक्तिक पाच हजार रूपये आणि कल्याणे खुर्द येथील उदेसिंग पाटील यांनी ११ हजार रूपयांची वर्गणी त्यांना सुपुर्द केली.