चित्रवेणूच्या आविष्कारासह शास्त्रीय-उपशास्त्रीय संगिताची अनुभूती
जळगाव – चित्रवेणू वादकाची स्वत:ला चिकारीसारखी तारेची साथ देण्याची क्षमता तसेच मधुर, सुर आणि पाश्चात् संगीताची अनुभूतीसह बासरी, सिताराच्या शतताराचा संगम असलेल्या चित्रवेणूतुन मिश्र भैरवी रागातील धून पं.उदय शंकर यांनी सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. शास्त्रीय-उपशास्त्रीय संगितामध्ये कट्यार काळजात घुसली मधील किरवानी रागातील दिल की तपिष, रानी तेरो चिरजीयो,नामगाऊ नामध्याऊ ह्या गाण्याने रसिकांची वाहवा मिळविली.बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीछत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात लंडन येथील डाॕ. लिना परदेशी, कॕनडा येथील मोहन कोरान्ने, समाजकल्याण विभागाचे आयुक्त योगेश पाटील, जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे व्हाईस प्रेसीडेंट पर्सोनल श्री. चंद्रकांत नाईक, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. भरत अमळकर, चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ. विवेकानंद कुलकर्णी, उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर यांच्या उपस्थितीत दोघंही सत्रातील कलावंतांचा सन्मान करण्यात आला. स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या २१ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लि., भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. जाई काजळ हे आहेत.द्वितीय दिनाची सुरुवात चित्रवेणू या नवीन वाद्यावर पं. उदय शंकर यांनी सुरवातीला राग यमन मध्ये जोड, झाला अतिशय उत्तम रित्या सादर केला. हा राग मध्य लय रूपक या तालात निबद्ध होता व बंदिश द्रुत तीनतालात सादर केली. यानंतर मिश्र भैरवी रागातील धून वाजविली. पं. उदय शंकर यांना तबला संगत मुंबईचे रामकृष्ण करंबेळकर केले. पंडितजींशी प्रश्नोत्तराचे एक उत्तम सेशन झाले. यामध्ये मुलाखतीच्या रूपाने सुसंवादिनी दीप्ती भागवत यांनी बोलतं केलं. यात चित्रवेणू वाद्याविषयी सांगितले. बासरीच्या ध्वनी किंवा आवाजावर आणि वार्याच्या (Wind Instrument) यापुर्वी कधीही न वाजविले गेलेले भारतीय अभिजात संगीत वाजविण्याची क्षमता असलेले चित्रवेणू वाद्याची अनुभूती जळगावकरांना विश्लेषणासह घेतली. *कट्यार काळजात घुसलीने जिंकली मने*द्वितीय दिनाचे द्वितीय सत्र पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांच्या शास्त्रीय व उप-शास्त्रीय गायनाने झाले. राग जोग. मध्यलय झपताल मध्ये बडा ख्याल : “रट नाम श्री गुरु का” द्रुत तीनताल: “तुम बिन कैसे कटे.” त्यानंतर अंकिता यांनी दादरा सादर केला बोल होते – “बलामा ओ मोरे सैया”, त्यानंतर राग- मारू बिहाग सादर करून आपल्या प्रतिभेची चुणूक रसिकांना दाखविली. सुप्रसिद्ध चित्रपट कट्यार काळजात घुसली मधील किरवानी रागातील दिल की तपिष. ह्या गाण्याने रसिकांची वाहवा मिळविली. त्यानंतर सादर झाले. हवेली संगीत – रानी तेरो चिरजीयो गोपाल, मराठी अभंग- नामगाऊ नामध्याऊ सादर करून आपल्या मैफिलीची सांगता केली. त्यांना तबला साथ रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनी अभिषेक रवंदे, धनंजय कंधार, मानसी महाजन यांनी दिली.*बालगंधर्व महोत्सवाचा आज समारोप* तृतीय दिनाचे प्रथम सत्र सहगायनाने संपन्न होईल. शास्त्रीय व उप-शास्त्रीय सहगायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करतील मुंबई चे गायक व गुरु पं. डॉ. राम देशपांडे, व त्यांचा मुलगा गंधार देशपांडे. त्यांना तबला साथ रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनी अभिषेक रवंदे करतील. बालगंधर्व महोत्सवाचा समारोप थ्री जनरेशन कॉन्सर्ट अर्थात तीन पिढ्यांच्या मैफलीने होणार असून ही मैफल सजवणार आहेत पद्मभूषण व ग्रॅमी ऍवार्ड विजेते पं. विश्वमोहन भट (मोहन वीणा) पं. सलील भट (सात्विक वीणा) व अथर्व भट (गिटार) यांच्या सहवादनाने एकविसावा महोत्सव संपन्न होईल.कार्यक्रमाच्या सुरवातीला गतवर्षी निधन झालेल्या कलावंतांना चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. मयूर पाटील यांनी गुरूवंदना म्हटली.