चोपडा ग्रामीण पोलीसांनी धुळे जिल्ह्यातील एक आरोपी ०१ गावठी बनावट्टी कट्टा (पिस्टल) व २ जिवंत काडतुस सह केले जेरबंद
प्रतिनिधी विनायक पाटील
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना गुप्त बातमीद्वारा मार्फत बातमी मिळाली की दिनांक ०१/०१/२०२५ रोजी सायकाळी ०६.१५ वा चे सुमारास लासुर ते सत्रासेन रोडवर एक इसम गावठी कट्टा (पिस्टल) हे घेवुन जात आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोनि कावेरी कमलाकर यांनी पोहेकॉ, राकेश पाटील, पोकॉ रावसाहेब एकनाथ पाटील, पोकॉ चेतन महाजन, पोकॉ गजानन पाटील, पोकॉ विनोद पवार अशांना माहिती देवून सदर इसमावर कारवाई करणे बाबत आदेश केले होते तेव्हा सदर कारवाई करीता नाटेश्वर मंदिरा कडे सापळा रचुन सदर इसम हे त्याच्या ताब्यातील यामाहा कंपनीची मोटार सायकल क्रमांक MH04 EL0308 याच्यावर आल्याने त्यांला थांबवुन त्याचे नाव गाव विचारता त्यांनी त्याचे नाव मनिष सुभाष जगताप रा महादेव मंदिराजवळ क्रांती चौक ता शिरपुर जि धुळे असे सांगुन त्याच्या ताब्यात ०१ गावठी बनावट्टी कट्टा (पिस्टल) व २ जिवंतकाडतुस व एक मोटार सायकल एक मोबाईल व ३००/-रु रोख असे एकुण १,२७,३००/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे सदर आरोपी विरुध्द पोकॉ गजानन पाटील यांनी फिर्याद दिल्या वरुन गुन्हा चोपडा ग्रामीण सी.सी.टी.एन.एस गुरनं ०१/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यांचा तपास पोनि कावेरी कमलाकर व पोकॉ विनोद पवार हे करीत आहे.सदरची कारवाई ही मा पोलीस अधिक्षक सो महेश्वर रेड्डी, मा अप्पर पोलीस अधिक्षक सो चाळीसगाव परिमंडळ, मा उपविभागीय पोलीस अधिकारी सो, चोपडा आण्णासाहेब घोलप यांचे मागेदर्शनाखाली पोनि कावेरी कमलाकर सो यांनी पोहेकॉ/२४३८ राकेश पाटील, पोकॉ/९२८ रावसाहेब एकनाथ पाटील, पोकॉ/१२५६ चेतन महाजन, पोकॉ/७९७ गजानन पाटील, अशांनी केली आहे.