चोपडा-पालकांची मुलांमध्ये आदरयुक्त भीती हवी परंतु मुलांना अति धाकात ठेवू नये : पंकज बोरोले
चोपडा (प्रतिनिधी) लतीश जैन
चोपडा – पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज बाल संस्कार केंद्रात पालक सभा घेण्यात आली या सभेत उद्घाटक व शाळेचे संचालक पंकज बोरोले यांनी पालक सभेत मार्गदर्शन करताना सांगितले की, पालकांची मुलांमध्ये आदरयुक्त भीती हवी परंतु मुलांना अति धाकात ठेवू नये.कारण त्यांचे दुष्परिणाम सुध्दा आपणास पाहायला मिळतात आणि तश्या बातम्या आपण रोज वृत्तपत्रातून वाचतच असतो त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधा त्यांना रोज एक गोष्ट सांगा ,खेळण्यासाठी घेऊन जा, बाहेरचे फास्टफूड ऐवजी त्याला पोळी, भाकर, पाले भाज्या खाऊ घाला म्हणजे तो तंदुरुस्त राहील सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोबाईल पासून लांब राहू दया मोबाईलचे व्यसन लागू देऊ नका असे अनेक उदाहरणे देत त्यांनी मौलिक विचार मांडले. सर्व प्रथम सरस्वती पूजन करण्यात आले या सभेमध्ये बालवाडी अभ्यासक्रम व त्याचे नियोजन या विषयावर विभाग प्रमुख सौ.रेखा पाटील यांनी पालकांना मार्गदर्शन केले व त्यानंतर विद्यार्थ्यांचे ( डेमो ) प्रात्यक्षिक सादरीकरण झाले. सर्वच विद्यार्थांनी यात सहभाग घेतला तसेच मुलांचे आनंददायी शिक्षण,आहार व आरोग्य याविषयी मार्गदर्शन श्रीमती. छाया बारी यांनी केले तसेच पालक सभेच्या वेळी स्टेजवर अध्यक्ष प्रकाश पाटील,प्रवीण पाटील,लतीश जैन आदी महिला पालक हजर होते चर्चेदरम्यान पालकांना पंकज विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की पालकांनी मुलांचा संवाद वाढवायला हवा, मुलांना जास्तीत जास्त मैदानीखेळ खेळू द्या, शब्द भंडार वाढवा. यासाठी प्रयत्न असावेत लिखाणाचा अट्टाहास करू नये. पालक प्रतिनिधींनी पण आपले मनोगत व्यक्त केले आजच्या सभेमध्ये 280 पालकांनी आपली उपस्थिती दिली व कार्यक्रमात सौ. भावना दिक्षित,सौ.मिना माळी, संध्या पाटील, जयश्री हिंगे,सुनंदा विसावे,अनिता बऱ्हाटे व मदतनीस नंदा पाटील, ज्योती माळी, विजय सोनवणे व कार्यक्रम उत्साहात यशस्वीरित्या पार पडला आभार सौ. रेखा पाटील यांनी मानले. व सूत्रसंचलन सौ. योगिता कोळी यांनी केले.