ताज्या बातम्या

चोपडा-यश हे फक्त कठोर परिश्रमाचे फळ आहे : श्री.महेंद्र पाटील (आगार प्रमुख चोपडा)

लोकनायक न्युज प्रतिनिधि लतीश जैन, चोपडा

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी दिनांक ०१ व ०२ ऑगस्ट रोजी ‘स्वागत समारंभ’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सुर्यवंशी उपस्थित होते तर उद्‌घाटक म्हणून चोपडा येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागाचे आगार प्रमुख श्री.महेंद्र पाटील हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस.पी. पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. डॉ. शैलेशकुमार वाघ, दिपक सोमाणी, सौ.माया शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक ए.एन. बोरसे व समन्वयक पी. एस. पाडवी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी महेंद्र पाटील आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, ‘यशाचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे कठीण मेहनत’. यावेळी त्यांनी आई वडिलांच्या कष्टाचे साफल्य होण्यासाठी मेहनतीचा सल्ला दिला तसेच वेळ व शिक्षण यांची योग्य तळजोड करुन यशस्वी व्हा, अशा शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाप्रसंगी इयत्ता ११ वी व १२ वी च्या विद्यार्थांनी आपल्या सुप्त कला गुणांना उजाळत विविध कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. डी. ए. सुर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिपाली पाटील, पुष्पा दाभाडे यांनी तसेच इयत्ता १२ वी वाणिज्य विभागाच्या विद्यार्थीनींनी केले तर आभार संदीप देवरे यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *