ताज्या बातम्या
जळगांव – धरणगाव माहेश्वरी समाजातर्फे महेश नवमी उत्साहात साजरी
धरणगाव : दिनांक २९ मे २०२३, सोमवार रोजी धरणगाव शहरात महेश नवमी निमित्त माहेश्वरी समाजातर्फे शरबत वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महेश नवमी हा दिवस माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने संपूर्ण समाज बांधव एकत्र येऊन भगवान शंकराची ची पूजा करतात. धरणगाव माहेश्वरी समाजातर्फे धरणगाव येथील बस स्थानकावर नागरिकांसाठी शरबत वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ज्येष्ठ सदस्य श्री रमेश काबरा, तसेच काबरा परिवाराचे सगळे सदस्य, महिला संगठन, युवा संगठन आदी उपस्थित होते. ८०० हून अधिक लोकांना शरबत वाटप करण्यात आले.