जळगांव-नाला खोलिकरणाचे काम वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव मार्फत करण्यात आले
दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी वराड बू व वराड खु. या दोन्ही गावामध्ये असलेल्या नाला खोलिकरणाचे काम वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव मार्फत करण्यात आले. या नाल्याला पावसाचे पाणी आले की पुर यायचा व गावामध्ये पाणी घुसायचे व त्याचा त्रास गावकऱ्यांना व्हायचा. तसेच नालाला पूर आल्याने वराड खु येथील मुलांना शाळेत जात येत नव्हते. ही बाब लक्षात जाणुन. वर्ल्ड व्हिजन इंडिया मार्फत वर्ल्ड व्हिजन इंडिया मार्फत नाल्याचे खोलीकरनाचे काम पूर्ण करण्यात आले. या मुले मुलांना व गावकऱ्यांना त्यांचा खूप मोठा फायदा झाला आहे. तसेच नाल्याजवल असलेल्या 3 बोरवलचे पाण्याचे स्त्रोत वाढले. या नाल्याचे उद्घाटन मा. तहसीलदार धरणगाव सूर्यवंशी, नायाब तहसीलदार लक्ष्मण सातपुते सर , वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव प्रकल्प अधिकारी मा. जितेंद्र गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित माझी. सरपंच विश्वास पाटील,माझी उपसरपंच निर्मला चव्हाण, डॉ. त्रिवेदी, अंगणवाडी सेविका लता पाटील, मदतनीस भाताबई, आशा वर्कर मनीषा पाटील, पत्रकार विनोद पाटील, गावकरी बापू पाटील,संजय पाटील, वराड बु सरपंच सखूबाई पाटील, पोलीस पाटील राजू वाडले,पत्रकार विकास पाटील, वर्ल्ड व्हिजन इंडिया सी एस सी वीजेश पवार कॅमुनिटी मोबिलिझर जितेंद्र पाटील उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ल्ड व्हिजन इंडिया प्रोग्राम कोओर्डीनेतर अंकिता मेश्राम यांनी केले व आभार कॅमुनिटी मोबिलिझर वैष्णवी पाटील हिने केले.