जळगांव – पवार यांनी गिरवला देवकरांचा कित्ता ; शेतक-यांकडे फिरवली पाठ !
मुक्त पत्रकार जयराम कोळी मो. 9960124904
जळगाव : जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक चे नवनिर्वाचित चेअरमन संजय पवार हे नुकतेच चोपडा तालुक्यात सदिच्छा भेटीच्या निमीत्ताने आलेले होते. यावेळी तालुक्यातील राजकीय नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या व विवीध विषयांवर चर्चा केली तसेच अनेक लग्न संमारंभांना उपस्थिती दिली. परंतू जिल्हा बँके ने पाठवलेल्या मालमत्ता जप्तीच्या नोटीसांची होळी झालेल्या गावांमधील शेतक-यांकडे जाण्याचे टाळले. शेतक-यांची मालमत्ता जप्त करु नये औरंगाबाद उच्च न्यायालयाचे 2012 चे आदेश असुन कर्ज फेडीची मुदतवाढ देण्याचे स्पष्ट केलेले असतांना देखील जिल्हा बँकेने शेतक-यांची अवहेलना करीत नोटीसा बजावलेल्या आहेत. याचा उद्रेक जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाला. याची सुरुवात चोपडा तालुक्यातील वर्डी गावापासुन झाली नंतर त्याचे लोण भडगाव तालुक्यात पसरले.जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष गुलाबराव देवकर व चोपडा तालुक्याचे जिल्हा बँकेत प्रतीनीधीत्व करणारे घनश्याम अग्रवाल यांना शेती व शेतकरी यांच्या समस्यांची जाणीव नाही वा सदर विषयी पुर्णपणे अनभिज्ञ आहेत. नवनिर्वाचित चेअरमन संजय पवार यांनी माचले येथील विवाह समारंभात पवार काही ही करु शकतात असे नमुद केले. हे कितीही खर असलं तरी चार वेळा मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री, कृषी मंत्री पद भुषविणारे पवार, मराठा आंरक्षण तसेच शेतक-यांसाठी काही केलेले नाही. देशात सर्व प्रथम कर्जमाफी तत्कालीन प्रधानमंत्री विश्वनाथ प्रतापसिंग यांनी 1989 मध्ये केली. त्यावेळी महाराष्ट्र चे मुख्यमंत्री पवार साहेब यांनी राज्याचा हिस्सा देण्यास नकार दिला हे सर्वश्रुत आहे. तरी जिल्हा बँकेने शेतक-यांचा छळ थांबवावा.