जळगाव – अखेर धरणगाव येथील भवानी मातेच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्णत्वास
धरणगाव – धरणगाव शहरातील जागृत देवस्थान असलेल्या भवानी मातेच्या भक्तांकरिता आनंदाची बातमी आहे. येथील भवानी मातेच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. भवानी मातेच्या दर्शनाकरिता धरणगावातील असंख्य भक्त नवरात्रीत व दररोज जात असतात भवानी मातेच्या भक्तांना पावसाळ्यात मंदिरात जाण्याकरिता खूप त्रास सहन करावा लागत असे. या रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी शहरातून वारंवार होत होती. मात्र रस्त्याची वहिवाट नसल्याने अडचण निर्माण होत होती. यास परिसरातील नागरिकांनी, गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय पदाधिकार्यांनी सहकार्य केल्याने आज या रस्त्याचे काम पूर्णत्वास आले आहे.
या रात्यासाठी भवानी मातेच्या भक्तांचे शिष्टमंडळ पालकमंत्री मा.ना. गुलाबराव पाटील यांना भेटून रस्त्यासाठी मार्ग काढण्याची मागणी केली होती. पालकमंत्र्यांनी भवानी मातेच्या भक्त मंडळाच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले होते. सदर जबाबदारी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी स्वीकारली होती. यासाठी संपूर्ण पाठपुरावा प्रताप पाटील यांनी केला. आणि आज अखेर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने भवानी मातेच्या भक्तांनी आनंद व्यक्त केला असून पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि प्रतापराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.