जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटींग फेडरेशनच्या संचालक पदी सौ.सरलाबाई पंढरीनाथ पाटील यांची बिनविरोध निवड

धरणगांव – तालुक्यातील भोद खुर्द येथील माजी सरपंच तथा कृषि उत्पन्न बाजार समिति धरणगांवचे माजी संचालक श्री पंढरीनाथ सुपडु पाटील उर्फ राजु पाटील यांच्या धर्मपत्नी तथा भोद खुर्द च्या माजी लोकनियुक्त सरपंच सौ.सरलाबाई पंढरीनाथ पाटील यांची जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशनच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे.
जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशनची स्थापना माजी आमदार स्व.रामराव जिभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली सन १९४६ मधे करण्यात आली होती. सहकारी संस्थाची शिखर संस्था म्हणून जिल्ह्यात नावाजलेली संस्था फेडरेशनच्या माध्यमातून जिल्हयातील सहकारी संस्थांना खतांचा पुरवठा केला जात असतो. या संस्थेवर जिल्हयातील सहकार महर्षी कै.प्रल्हादराव पाटील, उदेसिंग आण्णा पवार, सहकार महर्षी दामूभाऊ पाटील यांच्या सह अनेक सहकार महर्षीनी नेतृत्व केले आहे. सध्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे कामकाज चालू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलच्या सर्व जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.
महिला राखीव गटातून त्यांनी उमेदवारी केली होती. माघारीच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या गटातून एकमेव अर्ज आल्याने त्यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. त्यांची बिनविरोध निवड झाल्याने सर्व स्तरातील नेते मंडळी, सहकारी संस्थाचे पदाधिकारी तसेच परिसरातून त्यांचा सत्कार व अभिनंदन केले जात आहे.