टायगर ग्रुप खानदेशची नवीन कार्यकारणी जाहीर

धरणगाव तालुकाध्यक्षपदी कल्पेश कोळी,उपाध्यक्षपदी शहाबाज शाह तर तालुका संपर्कप्रमुख पदी भूषण महाजन यांची वर्णी.
धरणगाव प्रतिनिधी / अजय बाविस्कर
धरणगाव: टायगर ग्रुप भारत संघटनेने धरणगाव तालुक्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे संस्थापक अध्यक्ष जालिंदर जाधव व राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या आदेशानुसार तसेच टायगर ग्रुप उत्तर महाराष्ट्र प्रमुख सागर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. गेली दोन वर्षापासून धरणगाव तालुक्यात सामाजिक उपक्रम आणि युवक सक्षमीकरणाचे विविध पातळीवर सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना यावेळी संधी देऊन नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. यात कल्पेश कोळी यांची तालुकाध्यक्षपदी तर शहाबाज शाह यांची उपाध्यक्ष पदी व भूषण महाजन यांची तालुका संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. यावेळी सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे टायगर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.


