डॉ मोहसीन बागवान यांचे एम पी एस सी परिक्षेत यश
अमळनेर : अमळनेर शहरातील अल्लामा फजले हक खैराबादी (रहे) स्टडी सेंटर व पब्लिक लायब्ररी च्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षेत पारोळा येथील डॉ मोहसीन हाजी शकील बागवान उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार लायब्ररी चे अध्यक्ष रियाज़ शेख मौलाना यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक पुस्तक भेट म्हणून देण्यात आली . सदरहू कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना मुस्लिम समाजातील शैक्षणिक दुरावस्था लक्षात घेऊन रियाज़ शेख मौलाना यांनी आधी रोटी खाओ, बच्चों को पढ़ाओ.. इल्म रौशनी है, ज़हालत है अंधेरा असा संदेश दिला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पारोळा शहरातील रहिवासी शेख शकील बागवान यांचे सुपुत्र तथा अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते असलम बागवान यांचे भाचे डॉ मोहसीन हाजी शकील बागवान यांनी नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( एम पी एस सी ) स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या यशाचे विशेष महत्व म्हणजे त्यांनी एम बी बी एस चे शिक्षण पूर्ण करून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात सी एम ओ पदावर कार्यरत राहुन अहोरात्र परिश्रम करून एम पी एस सी स्पर्धा परीक्षेत प्रथमच प्रयत्नात यश मिळवले आहे. त्यामुळे मेडिकल ऑफिसर म्हणून येत्या काही दिवसांत रूजू होतील विशेष म्हणजे संपूर्ण जळगांव जिल्ह्यातील बागवान समाजातून ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करणारे डॉ मोहसीन बागवान हे पहिलेच उमेदवार आहेत. त्यामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यामुळे बागवान समाजात उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाबद्दल अभिरुची निर्माण होईल.
या सत्कार समारंभा प्रसंगी बागवान समाजाचे नूर मुहम्मद फकीरा बागवान, हाजी मुबीन टाॅकी वाले,आवास फाउंडेशनचे अध्यक्ष-अशपाक शेख, बब्लू पिरन बागवान, फारुख सर खाटीक, शफी चाॅद बागवान, शकील भिकन बागवान, इमरान हाजी सलीम बागवान, शाहरुख सिंगर, फ़ीरोज़ शेख,रहीम मलीक,साबीर मेंबर,खालीद राजु, अमीन पहेलवान,अमन भांजा, इस्हाक़ मुसा, सज्जाद,बकर, शोऐब, सिकंदर मलिक,अ.वाहेद,आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.