तळोदा येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न ; सौ सारिका ताई कैलास चौधरी यांचा पुढाकार
नंदुरबार (राहुल शिवदे) – भाजपाचे शहादा तळेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख कैलास चौधरी यांच्या सौभाग्यवती सारिका चौधरी यांनी सर्व स्तरातील महिलांना आमंत्रित करून स्नेह मिलन व हळदी कुंकू कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत असलेल्या पदाधिकारी यांचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी महापौर जयश्री आहिरराव ,अल्पा अग्रवाल,प्रदेश महा मंत्री विजय चौधरी यांच्या पत्नी वैशाली चौधरी,महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा शाणूताई वळवी,संयोजक नीला मेहता,धुळे शहर विधानसभा प्रमुख उमाताई कोलवले,महिला कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीता सोनार,अनिता कलाल,नीलम उदासी, रसिला बेन देसाई,आदी सह तळोदा शहरातील विविध क्षेत्रातील महीलंची उपस्थिती लक्षणीय होती,सौ सारीका चौधरी, यांनी १७०० ते१८०० महीलंचे एकत्रीकरण करून महिलांशी थेट संपर्क साधत बऱ्याच विषयवार चर्चा घडवून आणली.उपस्थित प्रमुख पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.