देवळाली प्रवरा जिल्हा परीषद शाळेत फराळ महोत्सवाचा विद्यार्थ्यांनी लुटला आनंद
प्रतिनिधी आशिष संसारे, राहुरी
RAHURI | देवळाली प्रवरा येथिल जिल्हा परीषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांनी एकञित दिवाळी फराळाचा अस्वाद घेतला या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला.असे कार्यक्रम प्रत्येक शाळेने आयोजित केले तर भारतीय संस्कृती ही महान संस्कृती असून दिवाळीचा आनंद भारतीय संस्कृतीमध्ये मोठा आहे.विचाराची देवाण-घेवाण करण्यासाठी आणि एकमेकांचे सुखदुःख चर्चा करण्यासाठी दीपावली फराळ महत्त्वाचा असतो.असे प्रतिपादन देवळाली प्रवरा केंद्र प्रमुख निलिमा गायकवाड यांनी केले.
जिल्हा परीषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेत प्रथमच फराळ महोत्सव आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमा प्रसंगी गायकवाड बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र उंडे हे होते. प्रभारी मुख्याध्यापक सुरेंद्र जासुद, शाळा व्यवस्थापन सदस्य अमोल भांगरे,अर्जुन तुपे,भास्कर बुलाखे,भारती पेरणे आदी उपस्थित होते.
फराळ महोत्सवात प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घरुन दिवाळी निमित्त तयार केलेले फराळ तर शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी ओली भेळ आणली. गोड आणि तिखट असा एकञ फराळ महोत्सवाचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला.
यावेळी निलिमा गायकवाड यांनी बोलताना सांगितले की, जिल्हा परीषद शाळा म्हणजे गोरगरीबांची शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी फराळ महोत्सव आयोजित केला.असे उपक्रम शाळेंनी राबविले पाहिजे.या उपक्रमातून आपली भारतीय संस्कृती ही महान संस्कृती आहे हे दिसून येते असे गायकवाड यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना राजेंद्र उंडे म्हणाले की,दिपावली सण सर्वांच्या घरी साजरा होतो असे नाही. गरीबांच्या मुलांना दिवाळी फराळाचा आनंद घेता यावा यासाठी फराळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे असे उंडे यांनी सांगितले.
यावेळी सुभाष अंगारखे, स्वाती पालवे, मिनाषी तुपे,शिवाजी जाधव,सुप्रिया आंबेकर,सुनिता मुरकुटे,वनिता तनपुरे,लक्ष्मी ऐटाळे,जकिया इनामदार,हसन शेख आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन भास्कर बुलाखे यांनी केले.