धरणगांव नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सरळ सरळ लढत

तर इतर प्रमुख पक्ष आणि अपक्ष ठरणार डोकेदुखी
धरणगांव – आगामी होऊ घातलेल्या धरणगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण सोडत मध्ये धरणगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदावर खुल्या प्रवर्गातून महिला उमेदवार विराजमान होणार आहे. प्रमुख सर्वच पक्षातील इच्छुकांमध्ये चढा ओढ असली तरी, पक्षश्रेष्ठी कोणत्या सक्षम महिलेला उमेदवारी देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना उबाठा गटा कडून प्रसिद्ध उद्योगपती सुरेश नाना चौधरी यांच्या धर्मपत्नी तथा माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या मातोश्री लीलाताई सुरेश चौधरी तसेच शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ यांच्या पत्नी उषाताई गुलाबराव वाघ यांची नावे चर्चेत आहेत.
तर शिवसेना शिंदे गटाकडून धरणगांव नगरपालिकेचे कर्मचारी विजय महाजन यांच्या पत्नी तथा माजी प्रभारी नगराध्यक्षा सुरेखा विजय महाजन तर धरणगांव नगरपालिकेचे माजी गटनेते विनय उर्फ पपू भावे यांच्या पत्नी वैशाली विनय भावे यांची नावे चर्चेत आहेत.
तसेच भाजप तर्फे धरणगांव नगरपालिकेचे माजी गटनेते कैलास माळी यांच्या पत्नी मनीषा कैलास माळी तर भाजप चे माजी जिल्हा उपाध्यक्ष अॅड. संजय छगन महाजन यांच्या पत्नी संगीता संजय महाजन तसेच अॅड. वसंतराव भोलाणे यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका चंद्रकला वसंतराव भोलाणे यांची नावे चर्चेत आहेत.
उमेदवारी देतांना पक्ष इच्छुकांची खर्च करण्याची ताकद आणि उमेदवाराच्या समाजाचे शहरातील प्राबल्ल्या यावर पक्षाची नजर असणार आहे. नगराध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदारांमध्ये चढा ओढ असली तरी पक्ष श्रेष्ठी अखेर जे निर्णय घेतील त्यावर पुढील गणित अवलंबून आहे. शेवटी महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये सरळ सरळ लढत निश्चित मानली जात असली तरी इतर प्रमुख पक्ष आणि अपक्ष हि मोठी डोकेदुखी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसाठी असणार आहे. अखेर धरणगांवकर कुणाला संधी देतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर तुम्ही कुणाला लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष म्हणून पाहणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा.


