धरणगाव तालुक्यात पिके करपली; खरीप हंगाम वाया जाण्याची भीती

महिना भरापासून शेतकरी पावसाचा प्रतिक्षेत
धरणगाव प्रतिनिधीविनोद रोकडेधरणगाव तालुक्यातील साळवे, जाभोरा, बाबोरी , नांदेड, हेडगेवार नगर, या भागात एक थेंबही पावसाचा न झाल्याने खरीप हंगामावर मोठे संकट कोसळले आहे. सोनवद धानोरा गारखेडा परिसरातील शेतांमध्ये मका, मूग, सोयाबीन, कापूस, उडीद, बाजरी, ज्वारी यासारखी पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. सुमारे ७५ टक्के पिके वाया गेली असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहेशेत-शिवारात उभ्या पिकांची वाढ थांबली असून, पाने पिवळी पडत आहेत. पिके उष्णतेने कोमजू लागली आहेत. जलस्रोतही आटू लागल्याने बोअरवेल व विहिरींचा आधारदेखील पुरेसा ठरत नाही. काही ठिकाणी फवारणीसाठी पाणी नाही.*बियाणे साठी घेतलेकर्ज मातीमोल ठरणार*शेतकऱ्यांनी यंदा चांगल्या पिकासाठी महागडी खते, बी-बियाणे, औषधे यावर मोठा खर्च केला होता. मात्र, आता तोच खर्च वाया जात असल्याचे दुःख शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. वाढती महागाई, मजूर याला तोड द्यावे लागत जर आता पाऊस झाला नाही तर हे सर्व घामाचे पैसे वाया जाणार, अशी भीती शेतकरी वर्गात व्यक्त होत आहेचौकट*दुष्काळ परिस्थितीमुळे दुष्काळ जाहीर करावा*प्रगतिशील शेतकरी श्री छोटू जाधव, या शेतकऱ्यांनी सांगितले की, आजपर्यंत असा एकही पाऊस झाला नाही की, शेतातून पाणी वाहून जाईल. विहिरीही कोरड्या पडल्या आहेत. शासनाने तातडीने कृत्रिम पावसासाठी पावले उचलावीत. धरणगाव तालुक्यातील शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत चातकासारखे डोळे लावून आहेत. काही दिवसांत जरही पावसाची सर झाली नाही, तर संपूर्ण खरीप हंगाम वाया जाऊ शकतो. शेतकऱ्यांनी पेरणी व मशागतीसाठी शासकीय कर्ज, खाजगी सावकार, बँकांचे कर्ज अशा विविध मार्गाने पैसे उभे केले आहेत. आता पीकच उद्ध्वस्त झाल्यास ते कर्ज फेडण्याचा कोणताही मार्ग शिल्लक नाही. कर्ज फेडायचे कसे अशी चिंता शेतकऱ्यांना लागून आहे, माय बाप शासन दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.