धरणगाव पालिकेची घरपट्टी विभाग आपल्या दारी मोहीम
धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगाव घरपट्टी नगरपालिका कार्यालय मार्फत , घरपट्टी व पाणीपट्टी मिळकत थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी मुख्याधिकारी श्री रामनिवास झंवर व कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘घरपट्टी विभाग आपल्या दारी’ ही दोन दिवसीय मोहीम राबविण्यात येत आहे
धरणगाव नगरपालिका कार्यालय चा वतीने दोन दिवसीय वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचे आयोजन धरणगाव नगरपालिका चे मुख्याधिकारी रामनिवास झंवर , कर कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी कर निरीक्षक हितेश जोगी निलेश लंके यांनी केले. यावेळी वसुली मोहिमेत थकबाकीसह चालू बिल भरण्यासाठी अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रम स जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्यातर्फे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी धरणगाव नगरपालिका तर्फे विविध भागांत मोहीम राबविण्यात आली घरपट्टी विभाग आपल्या दारी या संकल्पनेतून करधारकांपर्यंत सुसंवाद साधण्यात आला. कर भरा सहकार्य करा, दंडात्मक कारवाई टाळा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळीदीपक वाघमारे, आबिद मेहतर, शुभम जोशी, गुलाम गौस दस्तगीर, गणेश चौधरी, भगवान माळी, राजेंद्र शिंदे, मयूर पाटील, सुरेश चौधरी, प्रशांत चौधरी, वसंत चव्हाण, नारायण माळी, युवराज चौधरी, जितेंद्र वाघमारे, मोहन महाजन, केशव पैठणकर, सुरेश सोनवणे, राजेंद्र माळी, गणेश पाटील, शिरीष पाटील, संभाजी पवार, अनिल पाटील, मुख्याधिकारी श्री रामनिवास झंवर, कार्यालयीन अधीक्षक श्री भिकन पारधी, कर निरीक्षक- श्री हितेश जोगी व श्री मंगेश लंके उपस्थित होते.