ताज्या बातम्या

धरणगाव – पुणे बस सुरू करणेबाबत धरणगाव तालुका प्रवासी मंडळ तर्फे निवेदन

धरणगाव प्रतिनिधी विनोद रोकडे

धरणगाव तालुका प्रवासी मंडळा तर्फे एरंडोल आगारप्रमुख माननीय बेंडकुळे साहेब यांना फोन केला असता ते धरणगाव येथे येऊन प्रवासी मंडळाच्या समस्या ऐकून घेतल्या . तसेच शासन आले आपल्या दारी याचा आम्हाला अनुभव आला. मंडळातर्फे त्यांना धरणगाव- पुणे बस पूर्ववत सुरू करावी, धरणगाव – जळगाव शटल बस सुरू करावी , दुपारच्या वेळेस धुळ्याकडे जाण्यासाठी बस नाही त्यासाठी नवीन बस सुरू करावी, ,सकाळी 9 बाजेच्या सुमारास धरणगाव नाशिक बस सुरू करावी, धरणगाव पुणे स्लीपर बस रात्री सुरू करावी, चोपडा चाळीसगाव बस ला गणेश नगर साठी थांबा द्यावा,सकाळी रेल्वे कनेक्टेड बस सुरू करावी,जळगाव नवसारी बस पूर्ववत सुरू करावी,बस स्थानक परिसर मध्ये बेंचेस ठेवून बसण्यासाठी व्यवस्था करावी अशा मागण्या करण्यात आल्यात त्याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कोठारी, उपाध्यक्ष रवींद्र भागवत, सचिव एस डब्ल्यू पाटील ,किरण वाणी, हितेश पटेल, सुनील चौधरी, आनंद बाचपेयी ,राजेंद्र पडोळ, राजेश मकवाने डॉक्टर पंकज अमृतकर डॉक्टर स्वप्नील पाटील , एडव्होकेट हर्षल चव्हाण, किरण शेठ परिहार, बाबा कासार, सुदाम चौधरी हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *